पुणेकरांनो काळजी घ्या! इटलीपेक्षाही अधिक आहे मृत्यूदर

पुणेकरांनो काळजी घ्या! इटलीपेक्षाही अधिक आहे मृत्यूदर

पुण्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या आणि आतापर्यंत झालेले मृत्यू यांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. एकूण देश आणि राज्याच्या तुलनेत पुण्यात कोरोनाव्हायरसचा मृत्यूदर 13 टक्क्यांहून अधिक म्हणजे खूपच जास्त आहे.

  • Share this:

पुणे, 9 एप्रिल : राज्यात पुणे आणि मुंबईत सर्वाधिक कोरोनारुग्ण आढळले आहेत. याच दोन्ही महापालिका आणि आसपासच्या परिसरात सर्वाधिक मृत्यूही झाले आहेत. पण कोरोनाबाधितांची संख्या विचारात घेतली, तर Coronavirus चं सर्वात उग्र रूप सध्या पुण्यात दिसत आहे. पुण्यात कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर खूपच जास्त आहे. 9 एप्रिलला राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार पुण्यात आतापर्यंत 181 कोरोनारुग्ण सापडले आहेत आणि या शहरात 24 बळी गेले आहेत. याचा अर्थ पुण्यात कोरोनाचा मृत्यूदर 13 टक्क्यांच्या पुढे आहे. कोरोनाचं सर्वात भीषण रूप पाहिलेल्या इटलीहूनही हा मृत्यूदर जास्त आहे.

इटलीपेक्षाही भयंकर?

जगभरात इटलीने आतापर्यंत कोरोनाव्हायरसचं सर्वाधिक भयंकर रूप पाहिलं आहे. चीनमध्ये सुरू झालेली ही साथ त्या देशात मात्र 3 टक्के मृत्युदरापर्यंत रोखता आली. इटलीत कोरोनाचा मृत्यूदर 12 टक्के आहे. स्पेनमध्ये हा दर 10 टक्के आहे. म्हणजे प्रत्येक  100 कोरोनाबाधित व्यक्तींपैकी 10 जणांचा मृत्यू होत आहे.

वाचा - पुण्यात कम्युनिटी स्प्रेडचा धोका टाळण्यासाठी अनेक परिसर सील

फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये ही संख्या 10 टक्क्यांच्या जवळ जात आहे. इटलीतल्या लोम्बार्डी शहरात या विषाणूनं थैमान घातलं आहे. तिथला मृत्यूदर 18 टक्क्यांच्या आसपास आहे. न्यूयॉर्कमध्येही मृत्यूदर वाढत असून तो 5 टक्क्यांच्या आसपास आहे.

राज्य सरकारने 19 एप्रिलला दिलेली आकडेवारी :

राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार 9 एप्रिलपर्यंत मुंबईत 876 कोरोनारुग्ण आहेत आणि शहरात 54 मृत्यू झाले आहेत. हा मृत्यूदरसुद्धा 6 टक्क्यांच्या वर म्हणजे देशाच्या तुलनेत खूप जास्त आहे. संपूर्ण देशाचा विचार केला, तर मृत्यूदर तीन टक्क्यापेक्षा कमी आहे. भारतात आतापर्यंत 169 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे आणि देशात 5865 कोरोनाग्रस्त नोंदले गेले आहेत.

मध्य प्रदेशातल्या इंदौरमध्ये कोरोनाचा  मृत्यूदर जास्त आहे. तिथे आतापर्यंत 23 मृत्यू झाले आहेत. तिथे 9.7 टक्के एवढ्या कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात काय आहे कारण?

पुण्यात कोरोनारुग्णांची संख्या मुंबईच्या तुलनेत कमी वाढताना दिसते. पण मृत्यूचं प्रमाण मात्र गेल्या दोन दिवसात प्रचंड वाढलं आहे. कदाचित कोरोना चाचणीचं प्रमाण शहरात कमी असल्याने पॉझिटिव्ह रुग्ण फार आढळत नसावेत, हेही कारण वाढत्या मृत्युदरामागे असू शकतं.

(संकलन/संपादन - अरुंधती)

अन्य बातम्या

डॉक्टर वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू, तीन मुलांनी व्हिडिओ कॉलवरून घेतलं अंत्यदर्शन

कोरोनाविरुद्ध अमेरिकेला सापडली 10 औषधं? डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा

First published: April 9, 2020, 9:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading