Home /News /national /

डॉक्टर वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू, तीन मुलांनी व्हिडिओ कॉलवरून घेतलं शेवटचं दर्शन

डॉक्टर वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू, तीन मुलांनी व्हिडिओ कॉलवरून घेतलं शेवटचं दर्शन

इंदौरमध्ये एका डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या डॉक्टरांच्या तीनही मुलांनी व्हिडिओ कॉलवरून त्यांचं शेवटचं दर्शन घेतलं.

    इंदौर, 09 एप्रिल : देशातील सर्वात सुंदर शहर अशी ज्याची ओळख आहे त्या इंदौरलासुद्धा कोरोनाचा विळखा पडला आहे. इंदौरमध्ये एका डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. शत्रुघ्न पंजवानी असं त्या डॉक्टरांचं नाव असून दोनच दिवसांपूर्वी त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करत नव्हते मात्र अशा एखाद्या रुग्णाच्या संपर्कात ते आले असण्याची शक्यता आहे. पंजवानी हे त्यांच्या पत्नीसोबत रुपराम नगर इथं राहत होते. सध्या मध्यप्रदेशात कोरोनाने हाहाकार उडाला आहे. रुग्णांची संख्या 400 पेक्षा जास्त झाली आहे. इंदौरमध्ये गुरुवारी दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पंजवानी यांचाही समावेश आहे. पंजवानी यांच्या मृत्यूनंतर तीन मुलांनी त्यांचे अंत्यदर्शन व्हिडिओ कॉलवरून घेतलं. तिघेही ऑस्ट्रेलियात राहतात. लॉकडाऊनमुळे त्यांना इंदौरमध्ये येणं शक्य नव्हतं. तिघांनीही व्हिडिओ कॉल करून वडिलांवर अंत्यसंस्कार केले. कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर नियमानुसार त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या कुटुंबातील कोणालाही स्मशानभूमीत जाता येणार नाही. पंजवानी यांच्या पत्नीलाही त्यांचा मृतदेह जवळून पाहता आला नाही. हे वाचा : 'मी एकदम फिट'; कोरोनाचा बळी ठरलेल्या पहिल्या डॉक्टरांचा मृत्यूनंतर VIDEO व्हायरल डॉक्टर पंजवानी यांचा खासगी दवाखाना होता. त्यामुळे पंजवानी यांना कोरोना कसा झाला हा प्रश्न आहे. गेल्या काही दिवसांत पंजवानी यांच्याकडे आलेल्या रुग्णांची यादी करण्यात येईल. त्या सर्वांना आयसोलेट केलं जाईल आणि त्यांची चौकशी केली जाईल. त्यापैकी कोणाला कोरोना आहे की नाही हे तपासले जाईल. हे वाचा : LockDown : दोन हजार गावकऱ्यांनी बंद केलं एक वेळंच जेवण, कारण वाचून कराल सलाम इंदौरमध्ये आतापर्यंत एकूण 23 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. गुरुवारी दोन लोकांचा मृत्यू झाला. तर शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या 213 इतकी आहे. ज्या भागांना सील केलं आहे तिथं मेडिकल टीम सातत्यानं पाहणी करत आहे. तसंच संशयितांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. हे वाचा : कोरोनाविरुद्ध अमेरिकेला सापडली 10 औषधं? डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या