मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Coronavirus: 'दोन डोस घेतल्यानंतरही मृत्यू होतात, हे गांभीर्याने घ्या' अजित पवारांचा सल्ला

Coronavirus: 'दोन डोस घेतल्यानंतरही मृत्यू होतात, हे गांभीर्याने घ्या' अजित पवारांचा सल्ला

Ajit Pawar Press Conference in Pune: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली.

पुणे, 9 जुलै : पुण्यातील कोरोनाच्या स्थितीची आढावा बैठक (Pune Covid situation review meeting) घेतल्यावर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही आहे. लसीकरण सुरू आहे मात्र, नागरिकांनी नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. कारण, आज एक गोष्ट प्रकर्षाने समोर आला आहे तो म्हणजे कोविड प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेतल्यानंतरही काहींना कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे हे सर्व गांभीर्याने घ्या असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नागरिकांना दिला आहे.

दोन दिवस झाले लस नाही

पुण्यात 50 लाख लसीकरणाचा टप्पा पार केला आहे पण दोन दिवस झाले लस नसल्याने लसीकरण बंद आहे. लस पुरवठा होईल तसं लसीकरण करत आहोत. मृत्यू दर कमी झालाय पण लोकांनी मास्क वापरण्याची गरज आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याने खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

ओबीसी राजकीय आरक्षण: "फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारला टाईमपास करायचाय" फडणवीसांनी सांगितलं कारण...

'त्यांनी' परत मास्क वापरायला

पुणे शहरातील रुग्ण वाढीचा दर 5.9 टक्के, पिंपरी चिंचवडमधील रुग्ण वाढीचा दर 6 टक्के तर ग्रामीण भागात 7.2 इतका आहे. पुणे जिल्ह्याला लसींचा साठा मुलबलक प्रमाणात होत नाहीये. जगभरात मास्क वापरायचं बंद केलं त्यांनी परत मास्क वापरायला सुरूवात केली आहे. राज्यात म्युकर मयकोसिसचे 1268 एवढे रुग्ण आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.

सहकार मंत्रालयावर अजित पवारांची प्रतिक्रिया

केंद्राने केंद्राचं काम करावं, राज्याने राज्याचं काम करावं. सहकार मंत्रालयाच्या बाबतचा हेतू स्पष्ट नाही, आता राज्य सरकारने संरक्षण मंत्रालय काढून कसं चालेल असं म्हणत अजित पवारांनी केंद्राला टोला लगावला आहे. सहकार मंत्रालय काय नियम करतात ते बघून ठरवू, सहकार हा राज्याच्या अखत्यारीतील विषय आहे. सहकाराची मोठी चळवळ ही महाराष्ट्रात झाली आहे. सहकार क्षेत्रात काही चुकीची लोक असतील म्हणून सगळा सहकार चुकीचा नाही.

BREAKING: राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांना स्थगिती

अजित पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

50 लाख लसीकरणाचा टप्पा पार केला आहे पण दोन दिवस झाले लस नसल्याने लसीकरण बंद आहे

लस पुरवठा होईल तसं लसीकरण करतोय

म्युकर मयकोसिसचे 1268 एवढे रुग्ण

मृत्यू दर कमी झालाय पण लोकांनी मास्क वापरण्याची गरज आहे

आज एक गोष्ट प्रकर्षाने समोर आलाय, दोन लस घेतल्या नंतर मास्क घालायला टाळाटाळ करू नका, काही जणांचा दोन डोस घेतल्यानंतर ही बाधा होऊन मृत्यू झालाय, हे गांभीर्याने घ्या

पॉझिटिव्हिटी रेट - पुणे शहर 5.9, पिंपरी चिंचवड 6, ग्रामीण 7.2 इतका

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याने खबरदारी

4 नंतर दुकाने बंद होतात पण हातगाड्या सुरूच

पुणे जिल्ह्याला लसींचा साठा मुलबलक प्रमाणात होत नाही

फडणवीस बोलतात त्यात तथ्य नाही

जगभरात मास्क वापरायचं बंद केलं त्यांना परत मास्क वापरायला लागलेत

एमपीएससी च्या विद्यार्थ्यांची निवेदन घेऊन सोमवारी मंत्रालयात अजित पवारांनी लावली बैठक, नियुक्ती न मिळाल्यामुळे विद्यार्थी अजित पवारांना भेटले

23 गावांच्या समावेशनांतर वेळेनुसार गरजेनुसार निर्णय घेतले जातील

आम्हाला 32 वर्ष झाली आमचे ही आमदार निलंबित झाले होते पण त्या दिवशी जे झाल ते चुकीचं

कुणाला मंत्रिमंडळात कुणाला घ्यावं हा पंतप्रधानपदाचा अधिकार ..आम्ही कोण त्यात लुडबुड करणार

भारती पवार, कपिल पाटील हे आमच्याच पक्षाचे होते

मोदींकडे बघून हे लोक निवडून दिलेत

सहकार मंत्रालय विषय - केंद्राने केंद्राचं काम करावं, राज्याने राज्याचं काम करावं. हेतू स्पष्ट नाही आता राज्य सरकार ने संरक्षण मंत्रालय काढून कसं चालेल

काय नियम करतात ते बघून ठरवू

सहकार हा राज्याच्या अखत्यारीतील विषय

मोठी चळवळ महाराष्ट्रात, त्यात काही चुकीची लोक असतील म्हणून सगळा सहकार चुकीचा नाही

First published:
top videos

    Tags: Ajit pawar, Coronavirus, Pune