पुणे, 27 एप्रिल: मुंबईपाठोपाठ पुणे जिल्हाही कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. पुण्यात गेल्या आठवड्यात कोरोनाबाघितांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. रुग्णसंख्या 606 वरुन थेट 1319 वर पोहोचली आहे. म्हणजेच पुणे जिल्ह्यात दिवसाला सरासरी 100 रुग्ण आढळून येत आहे.
लॉकडाऊनच्या काळात निर्बंध अधिक कठोर केल्यानंतरही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पाहाणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकानेही चिंता व्यक्त केली आहे. सात दिवसांत रुग्णसंख्येत दुप्पट वाढ होत असून 9 पैकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळत असल्याचं निरीक्षण केंद्रीय पथकाने नोंदवलं आहे.
हेही वाचा... मुंबई महापालिकेची मोठी कारवाई, शहरातले 25 टक्के दवाखाने होणार बंद
पुण्यामधील रुग्णांमध्ये मुंबईच्या तुलनेत कमी वाढ होत असली तरीही लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता पुण्यात सध्या होणारी वाढही चिंतेचा विषय आहे. पुण्याच्या तुलनेत मुंबईतील लोकसंख्येची घनता कितीतरी अधिक आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाला आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत.
पुणे विभागात कोरोनाबाधित 1457 रुग्ण
पुणे विभागातील 230 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1457 झाली आहे. एकट्या पुणे जिल्ह्यात 1319 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकूण 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 48 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात 1319 बाधीत रुग्ण असून 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 33 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 65 बाधीत रुग्ण असून 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 29 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 11 बाधीत रुग्ण आहेत.
हेही वाचा.. 'वर्षभरात लस येईपर्यंत Corona सामान्य तापासारखा होईल', शास्त्रज्ञांचा अंदाज
आजपर्यत विभागामध्ये एकूण 15 811 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 14 935 चा अहवाल प्राप्त झाला आहे. 877 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 13428 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1457 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 54 लाख 35 हजार 546 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 6 लाख 3 हजार 94 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 131 व्यक्तींना अधीक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
संपादन- संदीप पारोळेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Pune news