मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबई महापालिकेची मोठी कारवाई, शहरातले 25 टक्के दवाखाने होणार बंद

मुंबई महापालिकेची मोठी कारवाई, शहरातले 25 टक्के दवाखाने होणार बंद

ही योजना ऐच्छिक असून त्यात नाव नोंदविण्याची कुठलीही सक्ती नसणार आहे. ज्यांना इच्छा असेल त्या सगळ्यांना नाव नोंदविता येणार आहे.

ही योजना ऐच्छिक असून त्यात नाव नोंदविण्याची कुठलीही सक्ती नसणार आहे. ज्यांना इच्छा असेल त्या सगळ्यांना नाव नोंदविता येणार आहे.

लॉकडाऊनमुळे सगळाच व्यवहार बंद आहे. त्यामुळे सगळ्या डॉक्टर्सनी काळजी घेत आणीबाणीच्या परिस्थितीत आपली सेवा सुरूच ठेवावी असे आदेश महापालिकेने दिले होते.

मुंबई 27 एप्रिल: कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मुंबई हॉटस्पॉट बनलं आहे. रुग्णांची संख्या दररोज वाढते आहे. अशा परिस्थितीत खासगी डॉक्टरांनी आपले क्लिनिक्स सुरू ठेवावे असं आवाहन बीएमसीने केलं होतं. त्यानंतर त्याबाबत आदेशही काढला गेला. मात्र अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने बंदच ठेवले. त्यामुळे नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेने 348 दवाखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोठ्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लॉकडाऊनमुळे सगळाच व्यवहार बंद आहे. या काळात स्थानिक दवाखाने बंद असल्याने इतर रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे सगळ्या डॉक्टर्सनी काळजी घेत आणीबाणीच्या परिस्थितीत आपली सेवा सुरूच ठेवावी असे आदेश महापालिकेने दिले होते.

असं केलं गेलं नाही तर तुमचं रजिस्ट्रेशन बंद करू असा इशाराही दिला होता. त्यानंतरही काहींनी दवाखाने बंदच ठेवले होते. त्यानंतर महापालिकेने पाहणी करत 348 दवाखान्यांचं रजिस्ट्रेशनच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात असलेल्या एकूण नोंदणीकृत दवाखान्यांपैकी बंद करणार असलेल्या दवाखान्यांची संख्या ही 25 टक्के एवढी होते.

GOOD NEWS: कोरोनाचा हॉटस्पॉट मालेगावात 440 पैकी 439 रुग्णांचा रिपोर्ट निगेटीव्ह

दरम्यान,  कोरोना विषाणूच्या साथीवर उपाय म्हणून केंद्र सरकारने एक मोठी योजना तयार केली आहे. येत्या एका आठवड्यात देशातील 11 राज्यांतील 27 जिल्ह्यांना कोरोना मुक्तीसाठी संपूर्ण शक्ती देण्याची सरकारची योजना आहे. देशातील या 7 जिल्ह्यांमध्ये देशातील जवळपास 70 टक्के कोरोना रुग्ण संक्रमित आहेत. या जिल्ह्यांसाठी विशेष धोरण आखल्यानंतरच सरकारने लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथिलता आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सरकारच्या कोरोनाशी संबंधित काही आकडेवारीमुळे दिलासा मिळाला आहे.

औरंगाबादमधून आली कोरोनाची धक्कादायक बातमी, डॉक्टरांनी केलं जाहीर

कोरोना विषाणूचे देशातील काही भागात अजूनही दुष्परिणाम आहेत. देशातील 26 हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्णांपैकी जवळपास 70 टक्के (सुमारे 18 हजार रुग्ण) देशातील 11 राज्यांमधील 27 जिल्ह्यांमध्ये आहेत. या आकडय़ाने इतर अप्रभावित किंवा कमी बाधित भागात लॉकडाऊन कमी करण्यास सरकारला प्रोत्साहन दिले आहे. ही आकडेवारी पाहिल्यानंतर कंटेनर क्षेत्रे वगळता देशाच्या सर्व भागात मर्यादित संख्येने दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

First published: