जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात 100 टक्के कर्फ्यू लागू, दिवसभरात 23 नव्या रुग्णांची नोंद

पुण्यात 100 टक्के कर्फ्यू लागू, दिवसभरात 23 नव्या रुग्णांची नोंद

पुण्यात 100 टक्के कर्फ्यू लागू, दिवसभरात 23 नव्या रुग्णांची नोंद

कोरोना व्हायरला प्रसार वेगाने होत असल्याने सरकारने पुण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 20 एप्रिल: पुणे शहरात कोरोनाबाधित रूग्णाची संख्या 612 वर पोहोचली आहे. सोमवारी (20 एप्रिल) दिवसभरात पुण्यात 23 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. एकट्या वेल्हा तालुक्यात 7 नवे रूग्ण आढळले आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 57 झाली. या पार्श्वभूमीवर पुण्यात 100 टक्के कर्फ्यू लागू करण्यात आली आहे. 27 एप्रिलपर्यंत हा नवा आदेश लागू असणार आहे, अशी माहिती पुणे शहराचे सहपोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिली आहे. कोरोना व्हायरला प्रसार वेगाने होत असल्याने सरकारने पुण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मध्यरात्री 12 पासून पुणे महापालिका हद्दीच्या सर्व सीमा सील करण्यात येत आहेत. त्यामुळे कुणीही सीमा हद्दीच्या बाहेर किंवा आत येऊ शकणार नाही. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने हा कठोर निर्णय घ्यावा लागला असं प्रशासनाने म्हटलं आहे. हेही वाचा..  धक्कादायक! विलगीकरण कक्षाच्या इमारतीवरुन संशयित रुग्णांनं घेतली उडी दुसरीकडे, पुण्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या भवानी पेठेत आता मनपा आरोग्य विभागाने घरोघरी आरोग्य तपासणी सुरू केली आहे. भवानी पेठेत आतापर्यंत 150 च्या जवळपास पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्यसेवकांनी या परिसरात जाऊन सर्दी खोकला, तापेचे रुग्ण शोधून त्यांचे स्वॅब घेण्याचं काम युद्ध पातळीवर हाती घेतले आहे. पुण्यात सर्वाधिक मृतांचा आकडा भवानी पेठेतील आहे. म्हणूनच ही आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. हेही वाचा..  मुंबईच्या महापौर ‘होम क्वारंटाईन’, आल्या कोरोनाबाधित पत्रकारांच्या संपर्कात सिटी जामा मशिद, शुक्रवार पेठ येथे नागरीकांना तपासणी करण्यास भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाकडून आरोग्य निरिक्षक संतोष कदम, निसार मुजावर, मोहन चंदेले मोकादम, मनेष वर्देकर, प्रदीप परदेशी, आदेश जाधव यांचे मार्फत नागरी प्रबोधन व जनजागृती करून नागरिकांच्या मनातील भीती व कोरोना रोगाविषयी असलेली भीती व गैरसमज दूर करून त्यांना वैद्यकिय पथकामार्फत प्राथमिक तपासणी करुन घेणेबाबत प्रवृत्त केले. त्यामुळे त्या भागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिक तपासणीसाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येत आहेत. संपादन- संदीप पारोळेकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात