Home /News /mumbai /

मुंबईच्या महापौर 'होम क्वारंटाईन', आल्या कोरोनाबाधित पत्रकारांच्या संपर्कात

मुंबईच्या महापौर 'होम क्वारंटाईन', आल्या कोरोनाबाधित पत्रकारांच्या संपर्कात

पुढचे 14 दिवस महापौर किशोरी पेडणेकर घरीच राहणार आहेत. महापौरांची Covid-19 टेस्ट केली असून त्यांचा बंगलाही सॅनेटाईज केला जात आहे.

मुंबई, 20 एप्रिल: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC)आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली असनाता दुसरीकडे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं आहे. पुढचे 14 दिवस महापौर किशोरी पेडणेकर घरीच राहणार आहेत. महापौरांची Covid-19 टेस्ट केली असून त्यांचा बंगलाही सॅनेटाईज केला जात आहे. हेही वाचा..BMC चे मुख्यालय सील करणार? आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना कोरोना मुंबई महापालिका आणि टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्या वतीने पत्रकारांची काही दिवसांपूर्वी Covid-19 चाचणी घेण्यात आली. त्यात 167 पत्रकारांची तपासणी करण्यात आली होती. त्यातल्या 53 जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यात पत्रकार, व्हिडीओ जर्नलिस्ट आणि फोटोग्राफर्स यांचा समावेश होता. महापौर किशोरी पेडणेकर काही पत्रकारांच्या संपर्कात आल्या होत्या. काही पॉझिटिव्ह पत्रकार महापौरांच्या घरी गेले होते. BMCच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना कोरोना दुसरीकडे, महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील दोन कर्मचाऱ्यांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दोघांवर उपचार करण्यात येणार असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचीही माहिती घेण्यात येत आहे. खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेतील आपत्ती व्यवस्थापन कक्ष सील करण्याचे काम सुरु आहे. हेही वाचा..गरोदर महिला वाट तुडवत घराकडे निघाली, वाटेतच झाली प्रसूती आणि... पत्रकारही कोरोनाच्या विळख्यात कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर आणि पोलीस हे आघाडीवर आहेत. त्याच बरोबर पत्रकारही प्रत्यक्ष फिल्डवर राहून घटनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. आतापर्यंत डॉक्टर आणि पोलिसांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं होतं. आता पत्रकारही कोरोनाच्या विळख्यात अडकल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईत आतापर्यत 53 जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यात पत्रकार, व्हिडीओ जर्नलिस्ट आणि फोटोग्राफर्स यांचा समावेश होता. या सगळ्यांनाच कुठलीही लक्षणं नव्हती. ही सर्व मंडळी प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारी आहेत. सगळ्यांवर आता उपचार करण्यात येणार असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचीही माहिती घेण्यात येत आहे. संपादन- संदीप पारोळेकर
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या