धक्कादायक! विलगीकरण कक्षाच्या इमारतीवरुन संशयित रुग्णांनं घेतली उडी

धक्कादायक! विलगीकरण कक्षाच्या इमारतीवरुन संशयित रुग्णांनं घेतली उडी

ठाणे जिल्ह्यातील विविध शहरी व ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

  • Share this:

भिवंडी, 20 एप्रिल: विलगीकरण कक्षाच्या इमारतीवरुन एका संशयित रुग्णानं उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत संबंधित रुग्ण गंभीर जखमी झाला आहे. पळून जाण्याच्या उद्देशातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. भिवंडी-कल्याण  रोडवरील राजनोली नाक्यावर असलेल्या टाटा आमंत्रण येथील टोलेजंग इमारतीत ही घटना घडली. प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात त्या संशयित रुग्णाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने त्यावर आळा घालण्यासाठी शासनाच्या वतीने  कल्याण-भिवंडी रोडवरील टाटा आमंत्रण येथील टोलेजंग इमारतीत विलगीकरणकेंद्र उभारण्यात आले. या केंदात ठाणे जिल्ह्यातील विविध शहरी व ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

हेही वाचा.. मुंबईच्या महापौर 'होम क्वारंटाईन', आल्या होत्या कोरोनाबाधित पत्रकारांच्या संपर्कात

एक मुंबईतील चेंबूर परिरात राहणार 44 वर्षीय व्यक्तीला 18 एप्रिल रोजी या क्वारंटाईन केंद्रात दाखल केले होते. मात्र रविवारी दुपारच्या सुमाराला कोणाचे लक्ष नसताना हा व्यक्ती इमारतीच्या पॅसेजमध्ये असलेल्या खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही व्यक्ती  गंभीर जखमी झाली आहे. त्याच्या पायाला गंभीर दुखापत  झाल्याने त्याच्यावर  शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.    याप्रकरणी पोलीस नाईक प्रशांत बाविस्कर यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात कोव्हीड 19 उपाय योजना 2020 चे नियम 11 व साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 2,3,4, व आपत्ती व्यवस्थापक अधिनियम 2005 चे कलम 51 (ब) सह भादंवि. कलम 188, 271,338 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 20, 2020, 7:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading