Home /News /pune /

पुण्यात कोरोना साथीशी लढणारा आरोग्य विभागच बाधित, 3 अधिकारी पॉझिटिव्ह

पुण्यात कोरोना साथीशी लढणारा आरोग्य विभागच बाधित, 3 अधिकारी पॉझिटिव्ह

धक्कादायक म्हणजे कोरोना साथीशी लढणारा आरोग्य विभागच बाधित झाला आहे. तीन सहायक आरोग्य अधिकारी पॉजिटिव्ह आढळले आहेत.

पुणे, 24 जुलै: राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. राज्यात मुंबई पाठोपाठ पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. पुण्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. पुण्यात 13 ते 23 जुलै 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन घेण्यात आला तरी देखील कोरोना आटोक्यात आला नाही. हेही वाचा...शरद पवारांना श्रीरामाचा विसर पडू नये, पुण्यात राष्ट्रवादी-भाजप आमनेसामने! धक्कादायक म्हणजे कोरोना साथीशी लढणारा आरोग्य विभागच बाधित झाला आहे. तीन सहायक आरोग्य अधिकारी पॉजिटिव्ह आढळले आहेत. पुणे महापालिकेत आतापर्यंत 313 कर्मचारी कोरोना पॉजिटिव्ह आढळले आहेत. त्यात आरोग्य विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, महापौरांसह 168 कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत तर 132 कर्मचारी सध्या उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 13 जणांची मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन संपताच समोर आली मोठी आकडेवारी... पुण्यात लॉकडाऊन गुरुवारी संपला. पण आता लॉकडाऊन संपल्या संपल्या धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 10 दिवस लादलेल्या लॉकडाऊनमध्ये नेमकं काय झालं? खरंच प्रशासनाला संसर्गाची साखळी तोडण्यात यश आलंय का? रूग्णसंख्येवर आवर घालण शक्य झालंय का? या सगळ्या प्रश्नाची उत्तर नाही अशी आहेत. लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या 9409 होती. तर 874 मृतांचा आकडा होता. 10 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये ॲक्टिव्ह रूग्णसंख्या तब्बल 17,056 आणि 1104 मृत्यू झाले. त्यामुळे आकडे वाढायचे थांबत नाही. दरम्यान, रुग्णवाढीमुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात घट झाली आहे. ते 16 ते 21 जुलै दरम्यान 45.9 टक्क्यांवर आले आहे. हेच प्रमाण 9 ते 15 जुलै दरम्यान 71.9 टक्के इतकं होतं तर 2 ते 8 जुलै दरम्यान 65.3 टक्के होतं. मात्र पूर्ण जिल्ह्याचा विचार करता मृत्यू दर कमी झाला आणि देशाचा,राज्याचा, मुंबईचा विचार करता सर्वात कमी मृत्यू दर पुण्याचा आहे. देशातील मृत्यू दर 2.41आहे तर पुणे जिल्ह्याचा 2.35 आहे. पिंपरी आणि थेरगाव परिसरात फक्त 4 तास उघडणार दुकानं दरम्यान, पिंपरी आणि थेरगाव परिसरात घोषित करण्यात आलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्य सेवेची दुकानं 8 ते दुपारी 12 पर्यंतच उघडी असणार आहेत. तसंच कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिकांच्या मुक्त वावरावर निर्बंध असतील हा आदेश आज मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत लागू असेल अशी माहिती सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊन जरी संपला असला तरी 31 जुलैपर्यंत पुणेकरांना नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. हेही वाचा...कैद्याच्या घरी बोकड पार्टी झोडली, दोन पोलिसांची ड्युटीच गेली! दरम्यान, पुढील शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन ठेवा, व्यापाऱ्यांनी केलेल्या या मागणीवर प्रशासन विचार करत असल्याचं पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितलं आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Coronavirus, Pune news

पुढील बातम्या