• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • कैद्याच्या घरी बोकड पार्टी झोडली, दोन पोलिसांची ड्युटीच गेली!

कैद्याच्या घरी बोकड पार्टी झोडली, दोन पोलिसांची ड्युटीच गेली!

तब्बल दोन तास गावी थाबूंन बोकड जेवणावर ताव मारून त्यांनी पुन्हा मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय गाठले आणि एक पोटदुखीसाठी गोळी घेऊन पुन्हा जेलकडे रवाना झाले.

  • Share this:
मंगळवेढा, 24 जुलै :  मंगळवेढा तुरुंगातील खून प्रकरण असलेल्या कैद्याला दवाखान्यात तपासणीसाठी म्हणून जेलमधून बाहेर काढल्यानंतर त्याला खासगी वाहनाने भरदिवसा त्याच्या घरी घेऊन जाऊन बोकडाचे जेवण करणे दोन पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. कैद्याला जिभेचे चोचले पुरवणाऱ्या या दोन्ही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पंढरपूर तालुक्यातील आंबे गावाचा एक आरोपी मंगळवेढा सबजेलमध्ये आहे. त्याच्या घरी 13 जुलै रोजी बोकड जेवणाची पार्टी होती. त्यामुळे त्याला हजेरी लावण्यासाठी त्या दिवशी गार्ड ड्युटीवरील बजरंग माने आणि उदय ढोणे या दोन पोलिसांनी पोटदुखी कारण दाखवून कैद्याला ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी नेण्याचा बहाणा केला. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता कारागृहातील रजिस्टरला नोंद केली आणि जेलबाहेर पडताच त्याला खाजगी वाहनाने थेट त्याच्या आंबेगावी पार्टीसाठी नेण्यात आले. उदयनराजेंना रोखण्याची आवश्यकता नव्हती, विधानसभा अध्यक्षांचा खुलासा तब्बल दोन तास गावी थाबूंन बोकड जेवणावर ताव मारून त्यांनी पुन्हा मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय गाठले. तेथे दुपारी 2.30 वाजता पोहचून एक पोटदुखीसाठी गोळी घेऊन पुन्हा जेलकडे रवाना झाले. मात्र, त्या पार्टीच्या दुसऱ्या दिवशी कारागृहात कैद्याच्या कोरोना तपासणीत तो पार्टीसाठी गेलेला कैदी पॉझिटिव्ह आढळला आणि एकच खळबळ उडाली. त्याच्यासोबत जेवणासाठी हजर असणाऱ्या अनेकांनी स्वतःहून घरात क्वारंटाइन करून घेतले होते, ही चर्चा सर्वत्र सुरू झाल्याने त्या कैदी पार्टीचे बिंग फुटले. VIDEO : एक्स बॉयफ्रेंडचा बदला घेण्यासाठी तरुणीनं जाळली कार आणि... या घटनेचे वृत्त स्थानिक दैनिक 'मंगळवेढा टाईम्स' मध्ये वृत्त येताच पोलीस दलात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची चौकशी एक दिवसात पूर्ण होऊन तात्काळ पोलीस अधीक्षक यांच्याकडे त्या दोन पोलिसांवर कारवाई बाबत उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील आणि पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला. त्या आधारे पहिल्या टप्प्यात निलंबनाची कारवाई केली असून दुसऱ्या टप्प्यात बडतर्फीची कारवाई निश्चित आहे असे त्यांनी सांगितलं.
Published by:sachin Salve
First published: