पुणे, 24 जुलै: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत येत्या 5 ऑगस्टला राम मंदिराचं भूमिपूजन पार पडणार आहे. दरम्यान, दुसरीकडे देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं होतं. ‘राम मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा,’ असा टोला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला होता. तर यानंतर शरद पवारांवर टीकेची झोड उठली आहे. हेही वाचा… काय म्हणावं असल्या मानसिकतेला! कांदा चाळीत टाकला युरिया, बळीराजा हवालदिल… पुण्यात भारतीय जनता युवा मोर्चाने (भाजयुमो) सिटी पोस्ट चौकात आंदोलन केलं. पवार साहेब “जय श्रीराम”, पवारांना श्रीरामाने बुद्धी द्यावी, अशा घोषणा यावेळी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. शरद पवारांना ‘श्रीराम’चा विसर पडू नये म्हणून अनोखं आंदोलन करण्यात आल्याचं भाजयुमोने पुणे शहर अध्यक्ष दीपक पोटे यांनी सांगितलं. ‘जय श्रीराम’ असं लिहिलेली 25 हजार पत्रे पुण्यातून शरद पवारांचच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी पाठवण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान भाजयुमोतर्फे शरद पवारांना सुमारे 10 लाख पत्रे राज्यभरातून पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती दीपक पोटे यांनी दिली आहे. दुसरीकडे, भाजयुमो या या आंदोलनाला राष्ट्रवादीने देखील त्याच स्टाईलनं प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना ‘जय भवानी जय शिवाजी’ या आशयाची पत्रे पाठवणार काय म्हणले होते शरद पवार..? अयोध्येतल्या ऐतिहासिक राम मंदिराचंभूमीपूजन 5 ऑगस्टला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमीपूजन केलं जाणार आहे. मात्र, शरद पवार यांनी राम मंदिर भूमीपूजनाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. हेही वाचा… दिल्लीतील शपथविधी वादावर अभिनेता रितेश देशमुखची बोलकी प्रतिक्रिया कोरोनामुळे देशभरात लागू करण्यात लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होत आहे. त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष द्यायला हवी. मात्र काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल, अशा शब्दांत शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आम्हालाही वाटत की कोरोना संपवला पाहिजे. पण कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत. ते दिल्लीत जाऊन या मुद्द्यावर प्रश्न मांडतील, असंही शरद पवार यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.