Home /News /pune /

शहरातच नाही, गावांतही कोरोनाचा हाहाकार; पुण्याच्या रुग्णांची ग्रामीण भागांत धाव, मावळमध्ये स्थानिकांना बेड मिळेना

शहरातच नाही, गावांतही कोरोनाचा हाहाकार; पुण्याच्या रुग्णांची ग्रामीण भागांत धाव, मावळमध्ये स्थानिकांना बेड मिळेना

ग्रामीण भागांतही आता कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यामध्ये असलेलं रुग्णालय कोरोना बाधित रुग्णांनी फुल झालं आहे. त्यामुळे स्थानिक रुग्णांना धावपळ करावी लागत आहे.

पुणे, 09 एप्रिल : पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये (Coronavirus Pune rural) गेल्या दोन दिवसांत कोरोनाची अत्यंत गंभीर स्थिती पाहायला मिळत आहे. बहुतांश रुग्णालयामध्ये कोरोनाचे बेड रिकामे नसल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यात आता शहरी भागांतील रुग्ण ग्रामीण भागांत धाव घेऊ (corona patients running towards rural area) लागल्याने जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्येही बेड फुल व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं ग्रामीण भागांतही आता कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. (Shortage of bed in Maval of Pune) वाचा - नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची हेळसांड; व्हेंटिलेटर नसल्याने रग्णवाहिकेतच प्रतीक्षा पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यामध्ये असलेलं रुग्णालय कोरोना बाधित रुग्णांनी फुल झालं आहे. याठिकाणीदेखिल आता कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं तालुक्यातील अनेक रुग्णांना बेडसाठी धावपळ करावी लागत आहे. शहरी भागातील बाधित रुग्णांना शहरातील रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध झाली नसल्यामुळं त्यांनी आसपासच्या तालुक्यांमधील रुग्णालयांत धाव घेतली. पण आता मावळ तालुक्यातील स्थानिक कोरोना बाधित रुग्णांची संख्यादेखिल मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पण रुग्णालयात जागाच मिळत नाही, त्यामुळं रुग्णांना रुग्णवाहिकेत घेऊन नातेवाईकांना विविध रुग्णालयांमध्ये चकरा माराव्या लागत आहेत. वाचा - अटीतटीच्या प्रसंगीही होतोय Remdesivir चा काळाबाजार! मुंबईत कारवाईचं सत्र सुरू आपल्या रुग्णाला चांगले उपचार मिळण्यासाठी नातेवाईक रुग्णालयं शोधत आहेत. पण मावळ तालुक्यात आयसीयू किंवा ऑक्सिजन बेडच काय पण जनरल वॉर्डातही रुग्णांना जागा मिळत नाही. त्यामुळं रुग्णांचे उपचाराविना होणारे हाल पाहून नातेवाईक हवालदिल झाले आहेत. पुणे मनपा आयुक्तांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लवकरात लवकर बेडची संख्या वाढवून रुग्णांची सोय करत असल्याचं म्हटलं होतं. पण अशाप्रकारे तालुक्यातील रुग्णालयंही फुल झाली असतील, तर प्रशासनानं आता मोठ्या प्रमाणावर बेड वाढवण्यासाठी हालचाल करणं गरजेचं आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Corona updates, Coronavirus, Pune

पुढील बातम्या