नाशिक, 09 एप्रिल: महाराष्ट्रातील कोरोना स्थिती (Corona pandemic) भयावह बनत चालली आहे. राज्यातील अनेक शहरातून कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. आता नाशिकमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका कोरोना रुग्णाला बेड उपलब्ध न झाल्यानं रुग्णवाहिकेतचं पडून राहावं लागलं आहे. या घटनेचा व्हिडीओही (Video) समोर आला असून सोशल मीडियात संताप व्यक्त केला जात आहे. कोरोना रुग्णांची अशाप्रकारे हेळसांड सुरू असल्याने नाशिक आरोग्य प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नाशिकमध्ये कोरोना स्थिती नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. व्हेंटिलेटर बेड न मिळाल्यानं एका रुग्णाला रुग्णवाहिकेतचं पडून राहावं लागलं आहे. जीवन मरणाच्या दारात असलेल्या रुग्णाची अशा प्रकारे होणारी हेळसांड पाहून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. नाशिकमध्ये अनेक रुग्णालयांत गेल्यानंतरही बेड मिळत नाहीयेत. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात धावपळ होतं आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकाने एक व्हिडीओ शूट करून प्रशासनाकडे मदतीची याचना केली आहे. (हे वाचा- अटीतटीच्या प्रसंगीही होतोय Remdesivir चा काळाबाजार! मुंबईत कारवाईचं सत्र सुरू ) किरण लोंढे असं संबंधित रुग्णाच्या जावयाचं नाव असून ते गेल्या काही तासांपासून आपल्या कोरोना बाधित सासऱ्याला घेऊन विविध रुग्णालयाच्या फेऱ्या लगावत आहेत. पण त्यांना शहरात कुठेही व्हेटिलेटर बेड मिळत नाहीये. गेल्या दोन तासापासून ते एका रुग्णालयाच्या बाहेर व्हेंटिलेटर बेडच्या प्रतिक्षेत उभे आहेत. तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता. संबंधित रुग्णाला ऑक्सिजन लावण्यात आला असून ते रुग्णवाहिकेतच पडून आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी त्याठिकाणी कोणताही वैद्यकिय कर्मचारी उपस्थित नाही.
नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची परिस्थिती बिकट, व्हेंटिलेटर मिळत नसल्याने कोरोना बाधित रुग्णवाहिकेतच पडून #Nashik #Maharashtra pic.twitter.com/yIN6DFmZxh
— News18Lokmat (@News18lokmat) April 9, 2021
(हे वाचा- हलगर्जीपणा! कोरोना लस घेण्यासाठी गेलेल्या महिलांना दिली अॅन्टी रेबीज लस ) गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये ऑक्सिजन, बेड, रेमडीसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. रेमडीसीवीर इंजेक्शनासाठी मोठ्या प्रमाणात आगाऊ पैसे मोजावे लागत आहे. दुसरीकडे राज्यात कोरोना लसीचा तुटवडा पडल्यानंही पहिल्या डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं आहे.