मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Breaking news! अटीतटीच्या प्रसंगीही Remdesivir चा काळाबाजार, मुंबई पोलिसांच्या कारवाईचं सत्र सुरू

Breaking news! अटीतटीच्या प्रसंगीही Remdesivir चा काळाबाजार, मुंबई पोलिसांच्या कारवाईचं सत्र सुरू

राज्यात सुरू असणारा रेमडिसिवीरचा (Remdesivir injection) काळाबाजार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. मुंबई क्राइम ब्रांचने केलेल्या आणखी एका छापेमारीत  272  रेमडिसिवीर इंजेक्शन जप्त केले आहेत.

राज्यात सुरू असणारा रेमडिसिवीरचा (Remdesivir injection) काळाबाजार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. मुंबई क्राइम ब्रांचने केलेल्या आणखी एका छापेमारीत 272 रेमडिसिवीर इंजेक्शन जप्त केले आहेत.

राज्यात सुरू असणारा रेमडिसिवीरचा (Remdesivir injection) काळाबाजार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. मुंबई क्राइम ब्रांचने केलेल्या आणखी एका छापेमारीत 272 रेमडिसिवीर इंजेक्शन जप्त केले आहेत.

मुंबई, 09 एप्रिल: राज्यात सुरू असणारा रेमडिसिवीरचा (Remdesivir injection) काळाबाजार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. मुंबई क्राइम ब्रांचने केलेल्या आणखी एका छापेमारीत  272  रेमडिसिवीर इंजेक्शन जप्त केले आहेत. मुंबई क्राइम ब्रांचने (Mumbai Crime Branch) अंधेरी परिसरात ही कारवाई केली. मुंबईच्या अंधेरी भागात जीआर फार्मा (GR Pharma, Andheri) नावाचे एक शॉप आहे, याठिकाणी काळाबाजार करण्यासाठी रेमडिसिवीर इंजेक्शन ठेवण्यात आले होते. पण मुंबई गुन्हे शाखेने धडक कारवाई करत या घटनेचा पर्दाफाश केला आहे.

मुंबई क्राइम ब्रांचने केलेल्या या कारवाईत आतापर्यंत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर इतर कुणी या काळाबाजाराशी संबंधित आहे का याचा तपास केला जात आहे. दरम्यान महाराष्ट्रामध्ये कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, त्यामुळे रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. अशामध्ये गेल्या काही दिवसांपासून या रेमडिसिवीरच्या काळाबाजाराच्या (Black Marketing of Remdesivir injection) घटना वारंवार घडत असल्याने चिंता वाढली आहे. संकटाच्या काळात काहीजण कृत्रिम तुटवडा निर्माण करुन ब्लॅकमध्ये चढ्या दराने औषध विक्री करत आहेत.

(हे वाचा-धक्कादायक! एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना कोरोनाची लागण, सर्वांनी घेतली होती लस)

दरम्यान अटक करण्यात आलेल्या या दोन्ही आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. यावेळी कोर्टाची परवानगी घेऊन जप्त करण्यात आलेले रेमडिसिवीर इंजेक्शन त्वरित रुग्णालयांना देण्यात येणार आहे, जेणेकरून गरजूंना त्याची पूर्तता केली जाईल.

गुरुवारी देखील मुंबई-नांदेडमधून मोठ्या प्रमाणात साठा जप्त

गुरुवारी मुंबई क्राईम ब्रांचच्या पथकाने मुंबईतील जोगेश्वरी (Jogeshwari) भागात रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी 12 रेमडिसिवीर इंजेक्शन जप्त केले आहेत. तर दुसरीकडे नांदेडमध्ये (Nanded) देखील रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून रेमडिसिवीर ब्लॅकमध्ये विकणाऱ्या चौघांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या चौघांकडून पोलिसांनी सात इंजेक्शनही जप्त केले आहेत. मूळ किंमत कमी असतांना रेमडिसिवीर इंजेक्शन तब्बल आठ हजार रुपयांना विक्री केली जात होती. पोलीस पथकाने वीरभद्र स्वामी, बाबा पडोळे, बालाजी धोंडे आणि विश्वजित कांबळे या चौघांना ताब्यात घेतले. हिंदुस्थान मेडिकल वाजेगाव आणि मनस्वी ऐजेसी संजीवनी हॉस्पिटल येथून हे चार आरोपी इंजेक्शन मिळवायचे आणि काळ्या बाजारात विक्री करायचे.

First published:

Tags: Andheri, Corona, Corona hotspot, Corona vaccine, Mumbai crime branch, Nanded