Home /News /maharashtra /

पुण्यात महिलेच्या मृत्यूचं गूढ; कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर तिसऱ्या दिवशीच झाला मृत्यू

पुण्यात महिलेच्या मृत्यूचं गूढ; कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर तिसऱ्या दिवशीच झाला मृत्यू

कोविड - 19 चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही या महिलेचा मृत्यू कसा झाला? याचा शोध वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे

    पुणे, 6 एप्रिल : पुण्यातील (Pune) एका 60 वर्षीय महिलेचे कोविड – 19 (Covid - 19) चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याच्या तीन दिवसांनी तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रविवारी या महिलेची कोविड – 19 तपासणी पॉझिटिव्ह आली होती. कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्यानंतर 14 दिवसांत त्याची लक्षणे दिसून लागतात, असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले असले तरी आतापर्यंत आलेल्या अनेक प्रकरणांमध्ये कोरोनाची लक्षणे 20 दिवसांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांमध्ये संभ्रम आहे. असाच एक प्रकार पुण्यात घडल्याचे समोर आले आहे. या महिलेला आरोग्याच्या इतरही काही समस्या होत्या. 1 एप्रिल रोजी पुण्यातील नायडू रुग्णालयात या महिलेची कोविड – 19 ची तपासणी करण्यात आली. त्यावेळी तिचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. त्यानंतर रुग्णालयाने तिला डिस्चार्ज दिला. मात्र 4 एप्रिल रोजी तब्येत बिघडल्याने तिला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. त्यावेळी तिचे कोविड – 19 ची तपासणी पॉझिटिव्ह आली होती. संबंधित - CM उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेला ‘मातोश्री’चा परिसर BMCने केला सील याबाबत पुण्याच्या जिल्हा आयुक्त  दीपक म्हैसकर म्हणाले, या प्रकरणाबाबत आरोग्य अधिकाऱ्यांकडून अधिक तपास केला जात आहे. पुण्याचे कलेक्टर नव किशोर राम म्हणाले, या केसचा अभ्यास करण्यात येत आहे. तपासणीवेळी कोविड – 19 इनक्युबेशनमध्ये असण्याची शक्यता आहे. आम्ही त्यांच्या प्रोफाइलचा तपास करीत आहोत. डिस्चार्ज दिल्यानंतर जेव्हा त्या घरी गेल्या त्यादरम्यान काय घडले याबाबतही चौकशी केली जात आहे. संबंधित - तज्ज्ञांनी दिली धक्कादायक माहिती! काही ठिकाणी Coronavirus तिसऱ्या स्टेजमध्ये
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या