Home /News /entertainment /

सहाव्या नेगिटिव्ह टेस्टनंतर कनिका कपूरला डिस्चार्ज, डॉक्टरांची 'ही' सूचना पाळावी लागणार अन्यथा...

सहाव्या नेगिटिव्ह टेस्टनंतर कनिका कपूरला डिस्चार्ज, डॉक्टरांची 'ही' सूचना पाळावी लागणार अन्यथा...

कनिका कपूरच्या सहाव्या टेस्टचे रिपोर्ट आले असून ते निगेटिव्ह आले आहेत. यानंतर कनिकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे

    मुंबई, 06 एप्रिल : जगभरामध्ये कोरोनाने (Coronavirus) ने हाहाकार माजवला आहे. लाखोंना कोरोनाची लागण झाली आहे तर मृतांचा आकडा देखील दिवसेंदिवस वाढत आहे. या गंभीर परिस्थितीमध्ये सरकारने लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली आहे. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशभरामध्ये लॉकडाऊन आहे. नागरिकांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत घरातच राहणं आवश्यक आहे. भारतामध्ये सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 3666 आहे तर आतापर्यंत 291 जणांनी कोरोनाला हरवत ते रोगमुक्त झाले आहेत. भारतात कोरोनामुळे 109 जणांनी प्राण गमावले आहेत. (हे वाचा-'आता घरी राहून कोरोनाचे बारा वाजवूया', महाराष्ट्र पोलिसांचं अनोखं आवाहन) भारतामध्ये कनिका कपूर (Kanika Kapoor) या प्रसिद्ध गायिकेला सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. तिच्या 5 टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांमध्ये आणि चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र त्यांना दिलासा देणारी बाब समोर येत आहे. कनिकाच्या सहाव्या टेस्टचे रिपोर्ट आले असून ते निगेटिव्ह आले आहेत. यानंतर कनिकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र जरी घरी पाठवण्यात आले असले तरी कनिकाला डॉक्टरांनी एक महत्त्वपूर्ण काम करण्यास सांगितले आहे. (हे वाचा-अमिताभ यांनी शेअर केला झगमगणाऱ्या भारताचा नकाशा, लोकांनी म्हटलं FAKE) कनिका कपूरला घरी पाठवल्यानंतर डॉक्टरांनी तिला 14 दिवस सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याची सूचना दिली आहे. इतरांची सुरक्षा लक्षात घेता कनिकाला 2 आठवड्यांसाठी क्वारंटाइन राहावं लागणार आहे. कनिका कपूरवर बेपर्वाइने वागण्याचे आरोप लागले होते. तिच्यावर एफआयआर देखील दाखल करण्यात आला होता. दरम्यान आता परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर याबाबत कनिकाची चौकशी होईल. लखनऊ पोलीस कमिशनर सुजीत पांडे यांनी न्यूज 18 ला दिलेल्या माहितीमध्ये म्हटलं आहे की, 14 दिवसानंतर लखनऊ पोलिसांकडून कनिकाची चौकशी करण्यात येईल. त्यांनी सांगितलं की कनिकाविरोधात भादवी कलम 188, 269 आणि 270 अंतर्गत FIR दाखल आहे. याबाबत पोलिसांची चौकशी होणार आहे. (हे वाचा-लॉकडाऊनमध्ये 'चेन्नई एक्स्प्रेस' चर्चेत, शाहरूखचा प्रसिद्ध डायलॉग VIRAL) 9 मार्च रोजी कनिका लंडनहून परतली होती आणि 20 मार्चला तिने ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं जाहीर केलं होतं. ही बाब लपवून ठेवण्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला होता. मात्र कनिकाने वारंवार या आरोपांचं खंडन केलं आहे. तिच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ती भारतात परतली त्यावेळी याठिकाणी आयसोलेशन सुरूच झाले नव्हते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या