मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यातील महाविद्यालयं सोमवारी उघडणार नाही, नवीन आदेश जारी!

पुण्यातील महाविद्यालयं सोमवारी उघडणार नाही, नवीन आदेश जारी!

महाविद्यालय उघडली जाणार आहे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबद्दल आदेश काढले आहे.

महाविद्यालय उघडली जाणार आहे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबद्दल आदेश काढले आहे.

महाविद्यालय उघडली जाणार आहे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबद्दल आदेश काढले आहे.

  पुणे, 09 ऑक्टोबर : कोरोनाची (corona) लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा, शॉपिंग मॉल, मंदिरं उघडण्यात आली आहे. शाळा सुद्धा 4 ऑक्टोबरपासून (schools) सुरू झाल्या आहेत. त्यानंतर आता सोमवारपासून महाविद्यालयं सुरू करण्याची घोषणा ( start colleges from Monday) करण्यात आली आहे. पण, पुण्यात (pune) सोमवारपासून जरी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा झाली असली तरी मंगळवारीच महाविद्यालय (pune colleges) सुरू होणार आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा महाविद्यालय बंद होती. आता कोरोनाची लाट ओसरल्यामुळे शैक्षणिक गाडी पुन्हा एकदा रुळावर आली आहे. पुण्यातील महाविद्यालय सोमवारी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. राज्यात आज 2486 नवीन रुग्ण; अहमदनगर, सोलापूर, पुण्यात रुग्ण वाढल्यानं धास्ती मात्र, सोमवारी सुद्धा महाविद्यालय बंदच राहणार आहे. सोमवारपासून महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, सोमवारी 11 ऑक्टोबरला महाविकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये भाजपच्या मंत्र्याने शेतकऱ्यांना गाडी चिरडून ठार मारले. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे सोमवारी महाविद्यालय बंद राहणार आहे. मंगळवारपासून महाविद्यालय उघडली जाणार आहे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबद्दल आदेश काढले आहे. त्यामुळे पुण्यात महाविद्यालयात जाण्यासाठी सज्ज झालेल्या विद्यार्थ्यांना एक दिवस उशिराने महाविद्यालयात जाता येणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता धुसर! दरम्यान,जालन्यात पत्रकारांशी बोलत असताना राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती, लसीकरणाबाबत माहिती दिली.  'टास्क फोर्सने  सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबरनंतर किंवा दिवाळीनंतर तिसरी लाट आली तरी ती जास्त प्रभावी ठरणार नाही,त्याचा मोठा परीणाम होणार नाही. असं अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर लक्षात आलं आहे. अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली पण तिचा प्रभाव जास्त दिसून आला नाही. मात्र लसीकरणामुळे कोरोनाची दाहकता कमी करता येऊ शकते, असंही ते म्हणाले. तुमच्या Bank खात्यांशी संबंधित माहिती पत्नी, मुलांना देणं यासाठी आहे महत्त्वाचं 'परभणी जिल्ह्यात एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्यानं शाळा 10 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण विभागाला आरोग्य विभागाने काही सूचना केल्या असून आणखी अशी घटना घडल्यास शालेय शिक्षण आणि विभाग त्या सूचनेनुसार निर्णय घेईल, असंही टोपे म्हणाले. 'नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत असली तरी तिथे काळजी करण्याची गरज नाही. तिथे लसीकरण वाढवण्यासोबतच कोरोना टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचंही टोपे यांनी सांगितलं.
First published:

पुढील बातम्या