जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / काम की बात : तुमच्या Bank खात्यांशी संबंधित माहिती पत्नी आणि मुलांना देणं यासाठी आहे महत्त्वाचं

काम की बात : तुमच्या Bank खात्यांशी संबंधित माहिती पत्नी आणि मुलांना देणं यासाठी आहे महत्त्वाचं

काम की बात : तुमच्या Bank खात्यांशी संबंधित माहिती पत्नी आणि मुलांना देणं यासाठी आहे महत्त्वाचं

बऱ्याचदा सर्व आर्थिक माहिती घरातील कर्त्या व्यक्तीलाच माहीत असते, पण अचानक त्या माणसाचा काही अपघात किंवा काही दुर्घटना घडल्यानंतर पूर्ण कुंटुंबाचे हाल होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. यानंतर तुम्ही तुमचे आयुष्य एका नवीन पद्धतीने जगायला सुरुवात करता. लग्नाबरोबर काम आणि जबाबदाऱ्या दोन्ही वाढतात. लग्नानंतर आर्थिक नियोजन करण्यात पती-पत्नी दोघांचेही पूर्ण सहकार्य असणे कधीही चांगले ( personal finance detail with your wife and children) असते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लग्नानंतर तुम्ही करत असलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती पत्नी आणि मुलांना सांगणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही काही आर्थिक नियोजन करता किंवा बँकेशी संबंधित कोणतेही काम करत असाल तर तुम्ही त्याची माहिती तुमच्या पत्नी आणि मुलांसोबत शेअर करायलाच हवी. जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत घराचे होणारे नुकसान टळेल. तपशील देणे महत्वाचे का आहे? सगळ्यांनाच माहीत आहे की, वाईट वेळ कोणालाही सांगून येत नाही. बऱ्याचदा सर्व आर्थिक माहिती घरातील कर्त्या व्यक्तीलाच माहीत असते, पण अचानक त्या माणसाचा काही अपघात किंवा काही दुर्घटना घडल्यानंतर पूर्ण कुंटुंबाचे हाल होते. त्यामुळे तुमच्या कुटुंबासोबत बँक खात्याशी संबंधित सर्व माहिती द्या. सर्व व्यवहाराबद्दल कुटुंबाला सांगा आणि संयुक्त खात्याची माहिती देखील द्या, कारण तुमच्या अनुपस्थितीत ही सर्व माहितीच कुटुंबाला कोणत्याही मोठ्या संकटातून वाचवू शकेल. हे वाचा -  Mumbai drug bust: क्रूझवरील 11 जणांपैकी तिघांना NCB ने दोन तासांत सोडलं?; Nawab Malik यांनी नावे आणि VIDEO केले जाहीर असे सर्व तपशील शेअर करा तुम्ही तुमच्या पत्नीचा बँक खाते क्रमांक, ऑनलाईन बँकिंग तपशील जसे युजरनेम, पासवर्ड आणि FD विषयी माहिती देऊ शकता, जेणेकरून ती आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या उपयोगी येऊ शकते. तमुच्या अनुपस्थितीतही कुटुंबाची त्यामुळे हेळसांड होणार नाही. हे वाचा -  12 लाखांची आलिशान गाडी 50 हजारांत आणली घरी; पुण्यातील तरुणाचा कांड वाचून चक्रावाल अनेक समस्या येणार नाहीत अनेक वेळा टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन यासारख्या गोष्टी क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्या जातात आणि त्यांचा ईएमआय ऑटो डेबिट होतो. अशा परिस्थितीत तुम्हाला वाटते की खात्यात पैसे आहेत, पण जेव्हा तुम्ही पैसे काढायला जाता तेव्हा रक्कम कमी दाखवते. म्हणूनच या व्यवहाराची देखील सर्व माहिती पत्नी आणि मुलांसोबत शेअर केली पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात