मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /राज्यात आज 2486 नवीन रुग्ण; अहमदनगर, सोलापूर, सातारा आणि पुण्यात रुग्ण वाढल्यानं धास्ती

राज्यात आज 2486 नवीन रुग्ण; अहमदनगर, सोलापूर, सातारा आणि पुण्यात रुग्ण वाढल्यानं धास्ती

अहमदनगर, सोलापूर, सातारा आणि पुण्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज राज्यात 2486 नवीन रुग्ण कोरोना रुग्ण सापडले असून 44 रुग्णांचा आज मृत्यू झाल्याची नोंद आहे.

अहमदनगर, सोलापूर, सातारा आणि पुण्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज राज्यात 2486 नवीन रुग्ण कोरोना रुग्ण सापडले असून 44 रुग्णांचा आज मृत्यू झाल्याची नोंद आहे.

अहमदनगर, सोलापूर, सातारा आणि पुण्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज राज्यात 2486 नवीन रुग्ण कोरोना रुग्ण सापडले असून 44 रुग्णांचा आज मृत्यू झाल्याची नोंद आहे.

मुंबई, 09 ऑक्टोबर : कोरोनाची दुसरी लाट राज्यातून ओसरत असली तरी अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण (Corona Patient) सापडण्याचे प्रमाण वाढत आहे. अहमदनगर, सोलापूर, सातारा आणि पुण्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज राज्यात 2486 नवीन रुग्ण कोरोना रुग्ण सापडले असून 44 रुग्णांचा आज मृत्यू झाल्याची नोंद आहे. सध्या कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के इतका असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के इतके आहे.

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा रुग्णवाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नगरमध्ये आज 340 रुग्ण आढळले आहेत. सोलापूर जिल्ह्यातही आकडा वाढल्याचे दिसत असून जिल्ह्यात आज 162 रुग्ण सापडले आहेत. तसेच साताऱ्यातही 102 बाधित रुग्णांची आज नोंद झाली असून पुण्यात 264 रुग्ण आज पॉझिटिव्ह सापडले आहेत. विशेषत: या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तर मुंबई आणि सर्व उपनगरांमध्ये मिळून 978 कोरोना बाधित रुग्ण आज सापडले आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Coronavirus Third Wave) धोका कायम आहे. कोणत्याही कारणामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत गेली तर काही राज्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट भयावह रूप धारण करू शकते. तज्ञांनी याबाबत चेतावणी दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे, की सुट्टीचा कालावधी संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता 103 टक्क्यांनी वाढवू शकतो आणि त्या लाटेत संक्रमणाची (Coronavirus Infection) प्रकरणे 43 टक्क्यांनी वाढू शकतात.

हे वाचा - Aryan Khan प्रकरणात चर्चेत आलेली शाहरुख खानची मॅनेजर आहे तरी कोण? 45 कोटींची आहे मालकीण

संशोधकांनी म्हटलं आहे, की सुट्टीच्या काळात पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे लोकसंख्येच्या घनतेत अचानक वाढ आणि सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कारणांसाठी मोठ्या संख्येने होणाऱ्या संमेलनांमुळे कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे वाढू शकतात.

आवश्यक आणि जबाबदार प्रवासावर भर देत तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की काही राज्यांमध्ये संभाव्य तिसऱ्या लाटेची परिस्थिती भीषण असू शकते.

First published:
top videos

    Tags: Corona patient, Corona spread, Corona updates, Coronavirus