वैभव सोनवणे, पुणे, 25 डिसेंबर : आज जर काही चुकीचं बोललो तर त्याला जबाबदार माझ्या वडिलांचे मित्र आणि ज्यांनी ही जबाबदारी घ्यायचा आदेश दिला मला दिला ते पवार साहेब असतील,’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील कार्यक्रमात सत्तेस्थापनेविषयी भाष्य केलं आहे. तसंच साखर कारखानदारी आणि शरद पवार यांचं राजकारण याबाबतही गमतीशीर भाष्य केलं आहे. ‘इथे कमी जागेत जास्त उत्पादन कसं घ्यायचं हे पवार साहेब शिकवतात. तर दुसरीकडे कमी आमदारांच्या जागेत सरकार कसं बनवायचं हेही त्यांनी शिकवलं,’ असं सांगत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची तोंडभरून स्तुती केली. तसंच आमच्याकडे जास्त जागा म्हणून कुणी ओरडू नये, असं म्हणत भाजपला टोला लगावला आहे. अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांच्या नावाची पाटी बदलली आणि सभेत पिकला मोठा हशा ‘मला चहात किती साखर हेच इंजिनिअरींगसारखं वाटलं होतं. त्यामुळे इथले सगळे विषय माझ्या डोक्यावरून जातात. येताना साखर उद्योगासाठी काय सांगायचं म्हणून जयंतराव आणि बाळासाहेबांशी बोलत होतो. इथे अजित पवार आहेत, पवार साहेब आहेत. सगळे दिग्गज मार्गदर्शक आहेत. या सगळ्यांच्या मदतीने शेतकऱ्याला मजबूत करायचा प्रयत्न करायचा आहे,’ असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 19 वर्षानंतर महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्री राहिलेले 2 नेते मंत्रिपदाच्या शर्यतीत दरम्यान, वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आज पुण्यात पार पडली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला आल्यापासून शरद पवारांनी उध्दव ठाकरे यांना अनेक बारीक-सारीक गोष्टी समजावून सांगितल्या. भाषणात काय मुद्दे हवेत ते राजेश टोपेंना कार्यक्रम सुरू असतानाच नोंद करून उद्धव ठाकरे यांना द्यायला सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.