19 वर्षानंतर महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्री राहिलेले 2 नेते मंत्रिपदाच्या शर्यतीत

19 वर्षानंतर महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्री राहिलेले 2 नेते मंत्रिपदाच्या शर्यतीत

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा शंकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदावरून दूर झाल्यानंतर आपल्याच मंत्रिमंडळाचे मंत्री असलेल्या शरद पवार यांच्या पुलोद मंत्रिमंडळात काम करण्यास धन्यता मानली होती.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे,(प्रतिनिधी)

मुंबई,25 डिसेंबर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 30 डिसेंबरला होणार आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी म्हणून यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवलेले दोन मंत्री इच्छुक आहेत. गेल्या साठ वर्षांत यापूर्वी मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या तीन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण, यंदा दोन माजी मुख्यमंत्र्यांना मंत्रिपद हवे आहे.

मुख्यमंत्रिपद हे राज्याच्या राजकारणात सर्वोच्च पद आहे. हे पद मिळावे यासाठी दिग्गज आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावतात. सर्वोच्च पद मिळालं की,राजकीय महत्त्वकांक्षा पुन्हा तेच पद मिळावे अथवा केंद्रात जावे याकडे बहुतांश कल असतो. पण राज्याच्या राजकारणात पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी तर मंत्रिपद मिळावे, म्हणून प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मंत्रिमंडळाचा सर्वोच म्हणून एकदा पद भूषवल्यानंतर पुन्हा दुसऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करणे राजकीयदृष्ट्या फारसे प्रतिष्ठेचं मानलं जातं नाही.

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा शंकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदावरून दूर झाल्यानंतर आपल्याच मंत्रिमंडळाचे मंत्री असलेल्या शरद पवार यांच्या पुलोद मंत्रिमंडळात काम करण्यास धन्यता मानली होती. त्यानंतर मराठवाड्यातील शिवाजीराव पाटील यांनी मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताच. आपल्याच मंत्रिमंडळात मंत्री असलेले शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात (1986 मध्ये) स्वतःची वर्णी लावून घेतली. यानंतर प्रदीर्घ काळानंतर शिवसेनेचे मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विलासराव यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून वर्णी लावून घेतली. नारायण राणे तब्बल 19 वर्षानंतर महाराष्ट्राच्या इतिहासात एकाच वेळी दोन मुख्यमंत्री राहिलेले नेते हे मंत्रिपदाचा शर्यतीत आहेत.

मंत्रिपदासाठी नेत्यांनी कसली कंबर..

इतिहास पहिला तर यशवंतराव चव्हाण, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, मनोहर जोशी हे नेते दिल्लीत केंद्रीयमंत्री अथवा नेते झाले. पण महाराष्ट्राच्या राजकारणात दुय्यम भूमिका स्वीकारली नाही. वसंतदादा पाटील मंत्रिपद राज्यपाल पद नाकारले, नाखूष होऊन राज्यपाल झाले, पण पुन्हा राज्यात आले ते मुख्यमंत्री म्हणूनच. तिच भूमिका शरद पवार यांची देखील राहिली. सुधाकर नाईक, वसंतराव नाईक, अंतुले, बाबासाहेब भोसले राजकारणातून बाहेर गेले पण दुययम भूमिकेत दिसले नाही. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात आले तर तब्बल 19 वर्षांनंतर दुय्यम भूमिकेत वावरावे लागेल. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण मंत्री म्हणून समावेश झालेले एकमेव नेते असतील. एकदा सर्वोच्च पद सांभाळून पुन्हा त्यापेक्षा खालचे पद नको, असे कितीही संकेत परंपरा असो, पण सत्ता ही सत्ता असते ती कुठल्याही रुपात असो, हे राजकारणातल वास्तव आहे, हे मात्र नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2019 01:47 PM IST

ताज्या बातम्या