पुणे, 25 डिसेंबर : ख्रिसमसला जगभरात मोठ्या आनंदानं आणि भक्तीभावानं सुरूवात झाली आहे. मध्यरात्री चर्चमध्ये प्रार्थना करून ख्रिसमसला सुरूवात झाली. आता दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम या निमित्तानं होतील. दरवर्षी 25 डिसेंबरला साजरा होणारा ख्रिसमस हा ख्रिश्चन समाजाचा सर्वात मोठा सण आहे. 24 डिसेंबरला संध्याकाळपासूनच या सेलिब्र्शनला सुरूवात होते आणि पुढे आठवडाभर हे सेलिब्रेशन चालते. पुण्यातील सेंट मेरी चर्चचे व्यवस्थापक स्मॅयुअर ओव्हाळ यांनी या सेलिब्रेशनबद्ल माहिती दिली. ’ दरवर्षी 24 तारखेला मिड नाईट सर्विसद्वारे ख्रिसमस चे सेलिब्रेशन सुरू होते. यामध्ये रात्री 11 ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत चर्चमध्ये प्रार्थना केली जाते. त्यानंतर 25 तारखेला सकाळी प्रार्थना करून ख्रिसमस सेलिब्रेशन सुरू होते. त्या दिवशी दिवसभर हे सेलिब्रेशन चालते. Kolhapur : … म्हणून ब्रिटीश सैनिकांसाठी बांधण्यात आले चर्च, 140 वर्षांचा आहे इतिहास, Video ख्रिसमसच्या सकाळी म्हणजे 25 डिसेंबरच्या सकाळी प्रभू येशूची प्रार्थना केली जाते. त्यानंतर नवीन वर्ष सुरू होईपर्यंत चर्चकडून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये तरुणांपासून लहान मुलांपर्यंत तसेच महिला वर्गांसाठी विविध कलागुण, तसंच खेळाच्या कार्यक्रमाचा समावेश असतो. सुट्ट्यांचा घ्या भरपूर आनंद; ख्रिसमस आणि नववर्षासाठी आहे खास ऑफर, पाहा Video प्रीती भोजनानं या सर्व कार्यक्रमांची सांगता होते. ख्रिसमसपासून नवीन वर्षापर्यंत चर्चच्या माध्यमातून सेलिब्रेशन केले जाते. आठवठाभर चालणाऱ्या या कार्यक्रमाची नवीन वर्षाच्या सुरूवातीला सांगता होते. हा संपूर्ण आठवडा सर्वांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक जण बाहेर फिरायला जातात आणि सुट्टीचा आनंद घेतात. त्याचबरोबर धार्मिक आणि रुढी परंपरांचंही यामध्ये पालन होतं, असं ओव्हाळ यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.