जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur : ... म्हणून ब्रिटीश सैनिकांसाठी बांधण्यात आले चर्च, 140 वर्षांचा आहे इतिहास, Video

Kolhapur : ... म्हणून ब्रिटीश सैनिकांसाठी बांधण्यात आले चर्च, 140 वर्षांचा आहे इतिहास, Video

Kolhapur : ... म्हणून ब्रिटीश सैनिकांसाठी बांधण्यात आले चर्च, 140 वर्षांचा आहे इतिहास, Video

कोल्हापूरच्या ताराबाई पार्क परिसरात असणारे ऑल सेंट्स चर्च हे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले चर्च आहे.

  • -MIN READ Kolhapur,Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

    कोल्हापूर 25 डिसेंबर : कोल्हापुरात ख्रिश्‍चन नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. शहरातील अनेक चर्चमध्ये भक्तिभावाने भगवान प्रभू येशूख्रिस्त यांची उपासना केली जाते. शहरातील जुन्या चर्चपैकी प्रत्येक चर्चला एक वेगळे महत्त्व आहे. कोल्हापूरच्या ताराबाई पार्क परिसरात असणारे ऑल सेंट्स चर्च हे देखील असेच एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले चर्च आहे. या ठिकाणी ख्रिसमसह वर्षभर बरेच ख्रिस्ती बांधव येत असतात. भरवस्तीत असणाऱ्या या चर्चचे वैशिष्ट्य म्हणजे हे चर्च ब्रिटिश सैनिक आणि अधिकाऱ्यांसाठी बांधण्यात आले होते. कधी बांधले गेले होते चर्च? ताराबाई पार्क मधील ऑल सेंटस चर्च हे जवळपास 140 वर्ष जुने ऐतिहासिक चर्च आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारे हे चर्च अनेकांचे लक्ष वेधून घेते. हे ब्रिटीशकालीन बांधणीचा उत्तम नमुना असलेले एक चर्च आहे. हे चर्च 1881 मध्ये बांधले गेले असल्याचे चर्चमधील एका कोरण्यात आलेल्या फरशीवरील मजकुरावरून समजते. जवळपास 3 एकर परिसरात हे भव्य चर्च आहे. एका बाजूला चर्च, एका बाजूला कम्युनिटी हॉल साठी सोडण्यात आलेली जागा आणि बाकीच्या जागेत लावण्यात आलेली विविध देशी झाडे यामुळे इथे येणारा प्रत्येकजण प्रसन्न होऊन जातो.

    घरच्या घरी बनवा ख्रिसमससाठी प्लम केक, पाहा सोपी पद्धत Video

    19 व्या शतकात कोल्हापूरात असलेल्या ब्रिटीश सैनिकांना  प्रार्थनेसाठी एखादे स्थळ असावे, या हेतूनेच या चर्चची निर्मिती झाली. तर मुंबईचे बिशप रा. रेव्ह. हेनरी अलेक्झांडर डगलस यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले होते. त्याचबरोबर या चर्चची रचना ब्रिटिश इंजिनियर मेजर चार्ल्स मँट यांची आहे. कोल्हापुरातल्या सर्व ब्रिटिशकालीन महत्वाच्या वास्तूंची रचना नवा राजवाडा, मेन राजाराम कॉलेज, टाऊन हॉल, सीपीआर आदी त्यांच्याच कलाकृती आहेत. कोल्हापूरचे महाराज छत्रपती शाहूंनी या चर्चसाठी जमीन उपलब्ध करून दिली होती. चर्चमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या स्मरणार्थ अनेक फलक लावलेले आहेत, अशी माहितीही ॲरोन गोगटे यांनी दिली आहे. कशी आहे चर्चची रचना? या चर्चमधील जो प्रेयर एरिया आहे, त्याठिकाणी 20 बेंच आहेत. इथेच प्रार्थना केली जाते. चर्चच्या दोन्ही बाजूला 2 रेस्ट्री अर्थात चर्चच्या पाळकांसाठी, चेंज करण्यासाठी जागा ठेवण्यात आलेली आहे. चर्चच्या बाहेर एक मोठी घंटा आहे, जी जुन्या काळात चर्चवर होती. पण कालांतराने डागडुजीवेळी ती खाली आणून बसवली आहे. वर्षभरातील मोठ्या कार्यक्रमांना, नाताळच्या पूर्व संध्येला रात्री अशा वेळी ही घंटा वाजवली जाते, असे देखील गोगटे यांनी सांगितले.

    25 प्रकारच्या केक सोबत घ्या ख्रिसमसचा डबल आनंद, पाहा video

    कोणत्या पद्धतीचे आहे चर्च ? ऑल सेंट्स चर्च हे एक अंग्लिकन पद्धतीचे चर्च आहे. ख्रिस्ती बांधवांमध्ये प्रोटेस्टंट आणि कॅथलिक असे दोन प्रकार असतात. त्या दोन्हींची मिळून एक मिश्र प्रार्थनापद्धत आहे, ज्या पद्धतीला अँग्लिकन पद्धत म्हणतात. त्याचं पद्धतीने या चर्चमध्ये प्रार्थना केली जाते. हे एक इंग्लिश सर्व्हिस देणारे चर्च आहे. अशाच पद्धतीचे मराठी मध्ये सर्व्हिस देणारे चर्च हे कोल्हापूर शहरातील ब्रह्मपुरी येथे आहे, असे गोगटे यांनी सांगितले आहे.

    गुगल मॅपवरून साभार

    कुठे आहे चर्चा? ऑल सेंट्स चर्च, रेसिडेन्सी क्लब शेजारी, मुख्य पोस्ट ऑफिस, वारणा कॉलोनी, कोल्हापूर

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात