Home /News /pune /

धक्कादायक प्रकार! पुण्यात हरणाची शिकार, कत्तल करणार तितक्यात...

धक्कादायक प्रकार! पुण्यात हरणाची शिकार, कत्तल करणार तितक्यात...

आरोपी परमेश्वर काळे हरणाची कत्तल करणार तितक्यात पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

पुणे, 1 नोव्हेंबर: देशात दुर्मिळ पशुपक्षी, प्राणी पाळणे, त्यांची खरेदी-विक्री करणे तसेच त्यांची शिकार करणे कायदेशीर गुन्हा आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात चिंकारा जातीची हरणाची शिकार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीनं शिकार केलेलं हरीण घरी आणलं होतं. हरणाचे पाय बांधून त्याची कत्तर करणार तितक्यात पोलिसांनी धाड टाकून त्याला मोठ्या शिताफीनं त्याला रंगेहाथ अटक केली. इंदापूर शहरातील सरस्वती नगर हा प्रकार घडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा...भाषण करताना तोंडावरून खाली सरकला मास्क, राज्यमंत्र्यांनी पुण्यात भरला दंड परमेश्वर अंकुश काळे (वय-33, रा. सरस्वती नगर, इंदापूर, जि. पुणे) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. शनिवारी रात्री (31 ऑक्टोबर) आरोपीने आपल्या गोखळी- वडापुरी गावच्या हद्दीतील शेताजवळ वनीकरणातील चिंकारा हरणाची सापळा व फास्याद्वारे पकडलं होतं. सकाळी त्यानं हरीण शहरातील सरस्वती नगर भागातील आपल्या घरी आणलं. सत्तुरच्या साह्यानं कापण्याच्या तयारीत असतानाच ही खबर इंदापूर पोलिसांना लागली. पोलिसांनी या प्रकाराची तातडीनं दखल घेत आरोपीच्या घरावर धाड टाकली. आरोपी परमेश्वर काळे हरणाची कत्तल करणार तितक्यात पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी चिंकारा हरणाची सुटका केली. आरोपीनं हरणाचे पाय बांधून ठेवले होते. त्याच्या शेजारी शेजारी सत्तुर देखील पडला होता. इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यासह काका पाटोळे, विशाल चौधर, विक्रम जाधव यांनी ही कारवाई केली. इंदापूर पोलिसांकडून हा गुन्हा वनविभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. आरोपीकडून शिकारीबाबत कसून चौकशी सुरू असल्याची माहिती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी दिली आहे. पोपट आणि दुर्मिळ कासवांची तस्करी... दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुंबईसह ठाण्यातून 88 वन्यजीवांची तस्करी ठाणे वनविभागानं उघड केली आहे. पोपट, खार आणि दुर्मिळ कासवांची तस्करी करताना दोन जणांना ठाणे वनविभागाच्या भरारी पथकानं रंगेहात पकडलं. पोपट आणि कासवांचा सौदा सुरू असतानाच वनविभागानं ही धडक कारवाई केली. धक्कादायक म्हणजे या माध्यमातून अटक केलेल्या तस्करांचं जाळ मुंबईभर पसरलेलं असून वनअधिकारी तपास करत आहेत. हेही वाचा...अध्यक्षपद नको नको म्हणतात अन् नेत्यांना नोटिसा पाठवतात, दानवेंचा सोनियांना टोला ठाण्यातील विवियाना मॉलजवळ प्रतिबंधित प्रजातीच्या पक्ष्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना वनविभागाने शिताफीने ताब्यात घेतलं. आरोपींकडून तीन दुर्मिळ पोपट जप्त केलं. उप वनसंरक्षक ठाणे, सहा वनसंरक्षक गिरीजा देसाई पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे, वनपाल संजय पवार, हेमंत कारंडे, वनरक्षक दत्तात्रय पवार यांच्या पथकाने ठाण्यातील wildlife welfare association च्या मदतीनं ही कारवाई केली.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Maharashtra, Pune, Pune news

पुढील बातम्या