मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

भाषण करताना तोंडावरून खाली सरकला मास्क, राज्यमंत्र्यांनी पुण्यात भरला 100 रुपये दंड

भाषण करताना तोंडावरून खाली सरकला मास्क, राज्यमंत्र्यांनी पुण्यात भरला 100 रुपये दंड

कोरोनापासून रक्षण करण्यासाठी सध्या तरी मास्क वापरणे, हाच एकमेव उपाय आहे. मात्र...

कोरोनापासून रक्षण करण्यासाठी सध्या तरी मास्क वापरणे, हाच एकमेव उपाय आहे. मात्र...

कोरोनापासून रक्षण करण्यासाठी सध्या तरी मास्क वापरणे, हाच एकमेव उपाय आहे. मात्र...

इंदापूर, 1 नोव्हेबर: राज्यात कोरोनासारख्या (Coronavirus) महाभयंकर आजाराची साथी आली आहे. कोरोनापासून रक्षण करण्यासाठी सध्या तरी मास्क वापरणे, हाच एकमेव उपाय आहे. मात्र, राज्यात बहुतांश मास्क विनामास्क फिरताना आढळून येत आहे. प्रशासनानं विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अशातच जंक्शन (ता. इंदापूर) येथील एका खासगी कार्यक्रमात भाषण करताना मास्क तोंडावरून खाली आल्यानं राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Minister Dattatray Bharane) यांनी स्वतः हून विनामास्कचा 100 रुपयांचा दंड भरला आहे.

हेही वाचा..फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय केराच्या टोपलीत, अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा

मिळालेली माहिती अशी की, राज्यमंत्री भरणे हे रविवारी जंक्शनमध्ये एका खासगी दुकानाच्या उद्घाटनाला आले होते. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बहुतांश नागरिकांच्या नाक आणि तोंडावर मास्क नव्हता. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना उपस्थित नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं. शासनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, भाषण सुरू असताना भरणे यांचा मास्क खाली सरकला होता. भाषणानंतर भरणे यांनी स्वत: लासुर्णे ग्रामपंचायत कार्यालयात विनामास्कचा 100 रुपये दंड भरला. नागरिकांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कृतीचा आदर्श घेवून विनामास्क फिरू नये, असं आवाहन वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केलं आहे.

वास्तविक आता लॉकडाऊनच्या काळानंतरही कोरोनाचा इंदापूर तालुक्यातील आकडा कधी कमी तर कधी जास्त होत आहे. नागरिक अजूनही विनामस्क फिरताना आढळतात. काळजी घेत नसल्याचे दिसून येते आहे. मात्र, प्रशासन विनामास्क कारवाईसाठी पुढे येते. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यावर राजकीय दबाव आणण्याचा अथवा हमरीतुमरीवर येण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. इंदापूर तालुक्यात मात्र स्वत: राज्यमंत्र्यांनी विनामास्क दंड भरुन नागरीकांना कारवाईला सामोरे जावं लागेल, असा संदेश वजा इशारा दिला.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मास्क वापरण्याबाबत गंभीर असताना नागरिक मात्र महाभयंकर कोरोनाला गांभीर्यानं घेत नसल्याचं दिसून आलं आहे. वेळीच दक्षणा न घेतल्यास येणाऱ्या काळात इंदापूर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा..ठाकरे सरकारने खाजगी डॉक्टरांना यादीतून वगळलं, लाखो कर्मचाऱ्यांना बसणार फटका!

4 दिवसांत आढळले 171 रुग्ण

दरम्यान, इंदापूर तालुक्यात गेल्या चार दिवसांत 171 कोरोना रुग्ण आढळून आल्यानं पुन्हा एकदा प्रशासनाची चिंता वाढली आहे. येणाऱ्या काळात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढणार असल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत इंदापूर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णाचा आकडा 3364 वर पोहोचला आहे. मात्र, तालुक्यातील नागरिक कोरोनाला गांभीर्यानं घेत नसल्याचं समोर आलं आहे. नागरिक बिनधास्त विनामास्क फिरत आहेत. राज्यमंत्री भरणे यांनी विनामास्क दंड भरला, याचा इंदापूरची जनता बोध घेणार काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

First published: