Home /News /pune /

Pune: चाराण्याची कोंबडी अन् बाराण्याचा मसाला! सिमकार्ड अपडेट करण्यासाठी मोजावे लागले 11 लाख

Pune: चाराण्याची कोंबडी अन् बाराण्याचा मसाला! सिमकार्ड अपडेट करण्यासाठी मोजावे लागले 11 लाख

सीमकार्ड बंद पडणार असल्याची भीती घालून एका अज्ञात सायबर भामट्यानं (Cyber Criminal) पुण्यातील वृद्ध महिलेला तब्बल 10 लाख 85 हजार रुपयांना लुबाडलं (10.85 lakh online fraud) आहे.

    पुणे, 03 सप्टेंबर: तुमच्या सीमकार्डची मुदत संपली (SIM card validity expired) आहे. संबंधित सीमकार्ड सुरू ठेवायचं असल्यास 24 तासांच्या आत अपडेट करून घ्यावं लागेल. सीमकार्ड अपडेट करायचं असल्यास दिलेल्या नंबरवर संपर्क साधा, अशा प्रकारे भीती घालून एका अज्ञात सायबर भामट्यानं (Cyber Criminal) पुण्यातील वृद्ध महिलेला तब्बल 10 लाख 85 हजार रुपयांना लुबाडलं (10.85 lakh online fraud) आहे. या प्रकरणी 57 वर्षीय महिलेनं वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गात अज्ञात सायबर चोरट्यावर गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सामनानं दिलेल्या वृत्तानुसार, 57 वर्षीय फिर्यादी महिला वानवडी परिसरात आपल्या कुटुंबासोबत वास्तव्याला आहे. दरम्यान 4 फेब्रुवारी रोजी एका अज्ञात सायबर चोरट्यानं फिर्यादीला एक BSNL कंपनीचा लोगो पाठवला. तसेच आपण BSNL कंपनीतील माजी कर्मचारी असून कोथरूडमधून बोलत आहे, असं खोटं सांगितलं. तसेच सीमकार्ड अॅक्टिव्हेशनची ऑनलाइन प्रक्रिया बंद असून त्यासाठी ऑफलाइन प्रक्रिया करावी लागेल, असं आरोपीनं फिर्यादी महिलेला सांगितलं. हेही वाचा-भाडं मागितल्यानं भाडेकरूची सटकली; घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरून फेकलं त्याचबरोबर, सीमकार्ड अपडेट करण्यासाठी आरोपीनं फिर्यादीकडून त्यांच्या बँक खात्याची माहिती मागवून घेतली. यानंतर आरोपीनं एटीएमच्या सीव्हीसी क्रमांकाचा वापर करून 75 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर 10 लाख 10 हजार रुपयांचं ऑनलाइन ट्रान्झेक्शन केलं. अशाप्रकारे अज्ञात सायबर चोरट्यानं फिर्यादी महिलेला गंडा घातला आहे. घटनेच्या जवळपास सात महिन्यांनतर फिर्यादीनं वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हेही वाचा-विदेशातील भावाचा डीपी ठेवून व्यावसायिकाला गंडवलं; अजब फंडा वापरून 4लाखांना लुटलं पोलिसांनी फसवणूक आणि सायबर गुन्ह्याच्या अन्य कलमांतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच संबंधित व्हॉट्सअॅप क्रमांक आणि बँक खात्याच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Cyber crime, Online fraud, Pune

    पुढील बातम्या