Home /News /pune /

पुणे: विदेशातील भावाचा डीपी ठेवून व्यावसायिकाला गंडवलं; अजब फंडा वापरून 4 लाखांना लुटलं

पुणे: विदेशातील भावाचा डीपी ठेवून व्यावसायिकाला गंडवलं; अजब फंडा वापरून 4 लाखांना लुटलं

Cyber Crime in Pune: विदेशात राहणाऱ्या चुलत भावाच्या फोटोचा वापर करत पुण्यातील एका व्यावसायिकाला तब्बल 4 लाख रुपयांना (Rs 4 lakh Fraud) गंडवल्याची घटना समोर आली आहे.

    पुणे, 03 सप्टेंबर: विदेशात राहणाऱ्या चुलत भावाच्या फोटोचा वापर करत पुण्यातील एका व्यावसायिकाला तब्बल 4 लाख रुपयांना (Rs 4 lakh Fraud) गंडवल्याची घटना समोर आली आहे. आरोपीनं विदेशात राहणाऱ्या फिर्यादीच्या चुलत भावाचा फोटो (cousin's photo used as whatsapp DP) आपल्या व्हॉट्सअॅपला डिस्प्ले पिक्चर (डीपी)  अर्थात प्रोफाइल फोटो ठेवून फिर्यादीची दिशाभूल केली आहे. अज्ञात सायबर भामट्यानं भारतातील एका मित्राला वैद्यकीय कारणांसाठी पैशाची गरज असल्याचं सांगत फिर्यादीकडून 4 लाख रुपये लुटले आहेत. याप्रकरणी फिर्यादीनं सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल (FIR Lodged) केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. नेमकं काय घडलं? पुण्यातील रहिवासी असणाऱ्या 53 वर्षीय व्यावसायिकाचा चुलत भाऊ अमेरिकेत राहातो. दरम्यान 12 जुलै रोजी त्यांना एक व्हॉट्सअॅप कॉल आला. संबंधित व्हॉट्सअॅप नंबरवर फिर्यादी व्यावसायिकाच्या चुलत भावाचा फोटो डीपी म्हणून वापरण्यात आला होता. त्यामुळे संबंधित कॉल आपल्या चुलत भावानेच केला असावा, असा समज फिर्यादी व्यावसायिकाचा झाला. यावेळी व्हॉट्सअॅप कॉलवरून येणारा आवाज अडखळत आणि खरखर येतं होता. हेही वाचा- कोर्टातून घटस्फोट घेतल्यानं जात पंचायतीला झोंबलं; पुण्यातील कुटुंबाचा पावणेतीन वर्षे केला छळ त्यामुळे त्यांना आपल्या भावाचा आवाज व्यवस्थित ओळखता आला नाही. यानंतर त्याच क्रमांकावरून अज्ञात सायबर चोरट्यानं फिर्यादीचा भाऊ असल्याचं भासवत चॅटींग सुरू केलं. तसेच भारतातील एका मित्राला वैद्यकीय कारणांसाठी पैशांची आवश्यकता असल्याचं सायबर चोरट्यानं फिर्यादीला सांगितलं. तसेच बँक खाते क्रमांक पाठवून पैसे पाठवण्यास सांगितलं. आपल्या चुलत भावानंच पैसे पाठवायला सांगितल्याचा समज होऊन फिर्यादीनं दिलेल्या क्रमांकावर 4 लाख रुपये ट्रान्सफर केले. हेही वाचा-आईवर विळ्यानं हल्ला होताना धाकट्याला नाही बघवलं;थरारक घटनेत थोरल्याचा खेळ खल्लास पण काही दिवसांनी फिर्यादींचा आपल्या चुलत भावाची संपर्क झाल्यानंतर, त्यांनी अशा प्रकारे कोणताही मेसेज केला नसल्याचं सांगितलं. यानंतर आपली फसवणूक झाल्याचं फिर्यादीच्या लक्षात आलं. यानंतर फिर्यादीनं तातडीनं सायबर पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. पुण्यात आतापर्यंत अशाप्रकारच्या सायबर गुन्ह्याचं पहिलंच प्रकरण समोर आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहेत. तसेच बँक खाते आणि व्हॉट्सअॅप नंबरच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cyber crime, Financial fraud, Pune

    पुढील बातम्या