महाराष्ट्रावर पावसाचे संकट वाढले, पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा

महाराष्ट्रावर पावसाचे संकट वाढले, पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रावर संकट आणखी वाढले आहे.

  • Share this:

पुणे, 18 ऑक्टोबर : कोरोनाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रात परतीच्या पावसानेही धुमशान घातले आहे. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त झाली आहे. पावसाचा जोर ओसरत नाही, तेच पुढील आठवड्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्याला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यामुळे 20, 21 आणि 22 तारखेला राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.

हेलिकॉप्टरमधून उतरताच शरद पवारांनी पहिले कार्यकर्त्यांना बजावले, पाहा हा VIDEO

भारतीय हवामान विभागाने याआधी 17 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात कोकणसह आतल्या भागात पाऊस पूर्णपणे सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवली होती. पण, आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रावर संकट आणखी वाढले आहे.

दोन दिवसांपासून राज्यात पावसाने थोडी उसंत घेतली होती. मात्र, वातावरण बदलल्याने परतीच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणामध्ये पावसाने हजेरी लावली. ऐन हंगामाच्या काळात हातातोंडाशी आलेले पिकं पाण्यात गेली आहे.  सोयाबीनसह अनेक पिकं ही काढणीला आली होती.  पण, परतीच्या पावसात सर्व काही डोळ्या देखत वाहून गेलं आहे.

Global Hunger Index: बांगलादेश-पाकिस्तानपेक्षा भारतामध्ये भूकबळीची समस्या गंभीर

सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना झाडावरच कोंबं फुटली आहेत. त्यामुळे सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यात जमा आहे. भाजीपाला आणि इतर फळपिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे.

Published by: sachin Salve
First published: October 18, 2020, 11:24 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading