उस्मानाबाद, 18 ऑक्टोबर : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज सकाळी उस्मानाबादेत दाखल झाले आहे. या दौऱ्याला सुरुवात करण्याआधीच शरद पवार यांचा कार्यकर्त्यांना कोरोनाच्या परिस्थितीचा आठवण करून देतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. हातातोंडाशी आलेली पिकं पाण्यात वाहून गेली आहे.
त्यामुळे पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज शरद पवार यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा आयोजित केला आहे. त्यासाठी शरद पवार हे सकाळी ठीक 9 वाजून 15 मिनिटांनी हेलिकॉप्टरने दाखल झाले.
शरद पवार यांच्या उस्मानाबाद दौऱ्याला सुरुवात pic.twitter.com/9qJM8TiLLj
— News18Lokmat (@News18lokmat) October 18, 2020
शरद पवार हे उस्मानाबादेत येणार असल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हेलिपॅडजवळ एकच गर्दी केली होती. शरद पवार आपल्या ताफ्याकडे जसे पुढे वळले तसा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी एकच गराडा घातला.
कोरोनाच्या अनुषंगाने सर्वांना सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी सांगितले जाते आहे. मात्र हा नियम शरद पवार यांच्या समोरच तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पायदळी तुडवत होते. त्यामुळे खुद्द शरद पवारांनी कार्यकर्त्यांना सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी सांगू लागले. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर सुरक्षारक्षक आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दूर केले.
शरद पवार हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तुळजापूर, उमरगा,औसा, परांडा, उस्मानाबाद भागाची पाहणी करणार आहे. उद्या अर्थात 18 ते 19 ऑक्टोबर दौरा करणार आहे. राज्यावर जेव्हा जेव्हा संकट परिस्थिती निर्माण झाली तेव्हा तेव्हा शरद पवार यांनी नेतृत्वाची कमान आपल्या हाती घेतली आहे. राज्यात कोरोनाची परिस्थितीत चिंताजनक आहे. पण, अशाही परिस्थितीत कोरोनाची तमा न बाळगता शरद पवार यांनी राज्यातील वेगवेगळ्या भागात जावून पाहणी केली.
असा आहे शरद पवारांचा दौरा
सकाळी 9 वाजता तुळजापूर येथे आगमन
9 ते 9:45 सर्किट हाऊस
9'45 ते10 काकरंबा वाडी कडे
10 ते 10:15 पाहणी
10:15 ते 11:05 सास्तुर कडे
11:05 ते 11:30सास्तुर येथे पाहणी
11:30ते11:40 राजेंगाव कडे
11:40 ते 12 राजेगाव पाहणी
12 ते 12:45 उमरगा कडे
12:45 ते1:40 राखीव
1:40 ते 2:10 कवठा कडे
2:10 ते 2:30 कवठा पाहणी
2:30 ते 3:15 उजनी कडे
3:15 ते 4:45 उजनी पाहणी ( ता औसा जिल्हा लातूर )
3:45 ते 4 पाटोदा कडे
4 ते 4:30 पाटोदा पाहणी
4:30 ते4:50 करजखेडा कडे
4:50 ते 5:15 काराज खेडा पाहणी
5:15 ते 5:40 तुळजापूर कडे सर्किट हाऊस मुक्काम
दिनांक19-10-2020
सकाळी 9 ते 9:20 कात्री कडे
9:20 ते 9:50 कात्री पाहणी
9:50 ते10:20 तुळजापूर कडे
10:30 ते 11 पत्रकार परिषद
11 ते 11:30 राखीव
11:30 ते परांडा कडे प्रयाण
12 ते 2 भोत्रा आणि आवारपिंप्री पाहणी
2 ते 3 राखीव
3 वाजता बारामती कडे प्रयाण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.