Home /News /pune /

'बारामती पॅटर्न': केंद्रीय समितीकडून कोरोना वॉरीयर्स, सोल्जर, फायटरचं कौतुक

'बारामती पॅटर्न': केंद्रीय समितीकडून कोरोना वॉरीयर्स, सोल्जर, फायटरचं कौतुक

बारामती पॅटर्न दिलासादायक आसल्याचे मत व्यक्त करून केंद्रीय समितीने या उपक्रमाचे कौतुक केलं आहे.

बारामती, 23 एप्रिल: कोरोनाचा संसर्ग वाढु नये म्हणून बारामती पॅटर्नची कडक अंमलबजावणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर गुरुवारी केंद्रीय समितीच्या पथकाने शहरातील कॉन्टोलमेंट एरियामध्ये जाऊन, बारामती पॅटर्न कशा पद्धतीने राबवला जात आहे. नागरीकांना घरी बसून लागणाऱ्या सर्व अत्यावश्यक वस्तू ,स्वयंसेवकांच्या माध्यमातून कशा पुरविल्या जातात. याचा आढावा त्यांनी घेतला. शेतकऱ्यांसाठी, परप्रांतीयांसाठी, महिलांसाठी आरोग्याबाबत काय उपाययोजना केल्या आहेत. याचीही माहिती या पथकाने घेतली. विशेष करून पोलिस विभागाने कोरोना वॉरीयर्स, कोरोना सोल्जर आणि कोरोना फायटर असे तीन विभाग करून 44 झोनल ऑफिसर, 44 नगरसेवक, 44 पोलिस कर्मचारी प्रत्येक वार्डातील स्वयंसेवक यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. त्यामुळे कोण, कुठली जबाबदारी पार पाडत आहे. हे ओळखपत्रवरून स्पष्ट होत होते. त्यामुळे बारामती पॅटर्न दिलासादायक आसल्याचे मत व्यक्त करून केंद्रीय समितीने या उपक्रमाचे कौतुक केलं आहे. हेही वाचा.. Coronavirus Updates:राज्यात आणखी 14 रुग्ण दगावली, कोरोनाबाधितांची संख्या 6427 बारामतीत आतापर्यंत कोरोनाचे सात पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्यानंतर एका वृद्धाचा यात मृत्यू झाला आहे. तर एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. बारामती शहरात केंद्रीय पथकातील डॉ.अरविंद अलोणी व डॉ. पी.के.सेन यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी शहरातील, स्टेशन रोड, महावीर पथ, कसबा, समर्थ नगर, सिल्‍व्‍हर ज्‍युबिली रूग्णालयाची पाहणी केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे व तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्‍यात येत असलेल्या आरोग्यविषयक सेवा सुविधांची माहिती दिली. शहरात ज्या भागात कोरोनोचे रूग्ण आढळले या भागाचा देखील त्यांनी परिपूर्ण आढावा घेतला. हेही वाचा.... अहमदनगरमध्ये 'जामखेड' हॉटस्पॉट, मृत रुग्णाची दोन्ही मुले कोरोनाबाधित पाहणी नंतर केद्रीय समितीचे डॉ. अलोणी व डॉ. सेन यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत सर्किट हाऊस येथे बैठक घेतली. या बैठकीमध्ये बारामती तालुक्यात कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाय योजनांचे सादरीकरण दाखविण्यात आले. सदरचे सादरीकरण पाहून डॉ.अलोणी व डॉ. सेन यांनी ‘बारामती पॅटर्न’ खूपच प्रभावी असल्याचे सांगून तो इतरांसाठीही मार्गदर्शक व दिलासादायक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केलं. सर्वच शासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक या अधिकाऱ्यांनी केले. या बैठकीस उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, सिल्‍व्‍हर ज्‍युबिली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे, नगरपरिषद मुख्याधिकारी योगेश कडूसकर, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, गटविकास अधिकारी राहूल काळभोर उपस्थित होते. यानंतर केंद्रीय पथकाच्या सदस्‍यांनी आशा ताईंशीही (आशा वर्कर्स) संवाद साधत माहिती घेतली. संपादन- संदीप पारोळेकर
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या