Home /News /maharashtra /

अहमदनगरमध्ये 'जामखेड' हॉटस्पॉट, मृत रुग्णाची दोन्ही मुले कोरोनाबाधित

अहमदनगरमध्ये 'जामखेड' हॉटस्पॉट, मृत रुग्णाची दोन्ही मुले कोरोनाबाधित

आतापर्यंत गुजरातमध्ये 8,903 कोरोनारुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 3,246 रुग्ण बरे झाले आहेत. तर 537 जणांचा जीव कोरोनाव्हायरसमुळे गेला आहे.

आतापर्यंत गुजरातमध्ये 8,903 कोरोनारुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 3,246 रुग्ण बरे झाले आहेत. तर 537 जणांचा जीव कोरोनाव्हायरसमुळे गेला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात जामखेड हे शहर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले आहे. काही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या जामखेड येथील एका रुग्णाची दोन्ही मुले कोरोनाबाधित झाली आहे.

  अहमदनगर 23 एप्रिल:अहमदनगर जिल्ह्यात जामखेड हे शहर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले आहे. काही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या जामखेड येथील एका रुग्णाची दोन्ही मुले कोरोनाबाधित झाली आहे.  त्यांच्या संपर्कातील दोन तरुणांनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. जामखेड येथे बुधवारी कोरोनाबाधित आढळलेल्या 2 व्यक्तींपैकी एकाच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या अहवालापैकी या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकाच दिवसात जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 5 ने वाढली आहे. सकाळी संगमनेर येथील 4 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या.  त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 37 वर गेली आहे. हेही वाचा..Coronavirus Updates:राज्यात आणखी 14 रुग्ण दगावली, कोरोनाबाधितांची संख्या 6427 जामखेड हॉटस्पॉट केंद्र जाहीर... जामखेड शहर हे यापूर्वीच हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आले आहे. 2 किलोमिटरचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केलेला आहे. 22 एप्रिलला जामखेड शहरात २ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने या भागातील प्रतिबंधात्मक आदेशात 6 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, 6 मेच्या रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, नेपाळ येथून संगमनेर येथे आलेल्या 14 व्यक्ती पैकी 4 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 37 वर गेली आहे. हेही वाचा..इंजिनीअर मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड अडचणीत, CCTV फुटेज सादर करण्याचे आदेश 4 एप्रिल ला या व्यक्तींना एका इमारतीतून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह आले होते.मात्र, 14 दिवसानंतर 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 04 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्व व्यक्तींना संगमनेर येथे संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात आले होते,  या 4 व्यक्तींचा देखरेखीखाली असण्याचा कालावधी संपणार होता. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार होते. संपादन- संदीप पारोळेकर

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Sandip Parolekar
  First published:

  Tags: Ahmednagar, Coronavirus, Symptoms of coronavirus

  पुढील बातम्या