मुंबई, 23 एप्रिल: राज्यात कोरोनाबाधितांमध्ये झापट्याने वाढ होत आहे. त्याबरोबर मृतांची संख्याही कमी होत नाही आहे. राज्यात गुरुवारी कोरोनाने 14 रुग्णांचा बळी घेतला आहे. तर 778 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 6427 झाली आहे. तर राज्यात आजपर्यंत एकूण 840 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
आरोग्य विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, राज्यात 14 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 6, 5 पुणे येथे, नवी मुंबई येथे 1, नंदूरबार येथे 1 आणि धुळे मनपा येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यात 8 पुरुष तर 6 महिला आहे. दरम्यान,कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 283 झाली आहे.
हेही वाचा.. पुण्यासाठी महत्त्वाची बातमी! अतिरिक्त निर्बंध झाले शिथिल पण...
आजपर्यंत प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या 96369 नमुन्यांपैकी 89,561 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर 6427 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 477 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 7491 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 27.26 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
दुसरीकडे, मुबईत गेल्या 24 तासांत तब्बल 522 नवे रूग्ण आढळली आहेत. मुंबईत एकूण कोरोना रूग्णांची संख्या 4205 झाली आहे.
पुणे विभागात कोरोनाबाधित 1 हजार 31 रुग्ण
पुणे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 31 झाली आहे. या विभागात 172 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 794 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकूण 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 13 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.विभागात 1 हजार 31 बाधित रुग्ण असून 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 936 बाधीत रुग्ण असून 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 21 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 37 बाधीत रुग्ण असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 27 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 10 बाधीत रुग्ण आहेत.
हेही वाचा.. मोठी बातमी! ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत कोरोना लसीच्या मानवी चाचणीस सुरुवात
आजपर्यत विभागामध्ये एकूण 11 हजार 707 नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते. त्यापैकी 11 हजार 46 चा अहवाल प्राप्त झाले असून 662 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 9 हजार 964 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 31 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
संपादन- संदीप पारोळेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.