सुमित सोनवणे, प्रतिनिधी
चिंचवड, 09 फेब्रुवारी : टमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. आपली परंपरा आहे की सुख दुःख मध्ये आधार देण्याचे काम करतो. आज सकाळी शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत . आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवसाची एक क्लिप बघितली की टाइम्स स्केवरमध्ये पण साजरा होत आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंना शुभेच्छा दिल्यात.
चिंचवड पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ठाण्यातील युवासेनेचे कोअर कमिटीचे सदस्य नितीन लांडगे यांचे मित्र हे अमेरिकेत वास्तव्यास आहे. अभिनव जैन, राजीव पंड्या, रूचिता जैन यांनी आज न्यूयॉर्कमध्ये एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन केक कापला, याबद्दल व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अजित पवार यांनी याबद्दल सांगत मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.
(आता काही दिवसच त्रास नंतर..., आदित्य ठाकरेंचा पुन्हा शिंदे गटाला इशारा)
आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला. मला सकाळी बातमी पाहायला मिळाली. राजीव सातव यांनी उत्तम काम केलं होतं. राहुल गांधी यांचे जवळचे ते होते. अतिशय कमी वयात ते आपल्याला सोडून गेले. प्रज्ञाताई यांच्यावर जबाबदारी पडली आहे. राजकीय वारसा त्या पुढे घेऊन जात आहेत. त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर दगडफेक झाली त्या गोष्टीचा ही निषेध आहे. एखादा लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार यांच्या सुरक्षेची जबाबदारी गृहमंत्र्यांची असते. कोण मास्टरमाईंड या हल्ल्या मागे आहे ते शोधून काढले पाहिजे. अशा प्रकारचे हल्ले कोणावर होता कामा नये, असंही अजित पवार म्हणाले.
(Hasan Mushrif : ...तर मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार, मुश्रीफांचे सोमय्यांना थेट आव्हान)
'कोणी आमदार अपात्र ठरलं आणि दुसऱ्याने १४५ चे सिद्ध केले तर राज्यपाल यांना संधी द्यावी लागेल. त्रिशंकू लागते तेव्हा अशी परिस्थिती होते त्यांनी कायद्याच्या अभ्यास केला आहे मला काही त्यावर बोलायचे नाही. जर तर ला मी उत्तर देत नाही, असंही अजित पवार म्हणाले,
"मी राहुलला विचारले नाही कोणी फुस लावली. आता विचारतो की बाबा तुला कोणी फुस लावली? असं म्हणत अजित पवार यांनी बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंना प्रश्न विचारला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.