मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Hasan Mushrif : ...तर मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार, मुश्रीफांचे सोमय्यांना थेट आव्हान

Hasan Mushrif : ...तर मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार, मुश्रीफांचे सोमय्यांना थेट आव्हान

कोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडीने धाड टाकल्यानंतर किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. याला हसन मुश्रीफ यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

कोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडीने धाड टाकल्यानंतर किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. याला हसन मुश्रीफ यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

कोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडीने धाड टाकल्यानंतर किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. याला हसन मुश्रीफ यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 09 फेब्रुवारी : मागच्या एक महिन्यापासून किरीट सोमय्या आणि हसन मुश्रीफ यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत  आहेत. दरम्यान मागच्या आठवड्यात कोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडीने धाड टाकल्यानंतर किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. याला हसन मुश्रीफ यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर आमदारकीचा राजीनामा देईन, अशी  प्रतिक्रिया आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

माझ्या बदनामीसाठी षडयंत्र आखलं जात आहे. याचा बोलवता धनी लवकरच उघड करू, अशा इशाराही त्यांनी दिला. सोमय्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आमदार विनय कोरे आणि शिंदे गटाचे संचालक यांना किरीट सोमय्या यांच्याकडे पाठवणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितलं.

हे ही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद ओकची खास पोस्ट,फोटो शेअर करत म्हणाला....

यावेळी मुश्रीफ म्हणाले की, काल किरीट सोमय्यांनी बेताल, खोटी आणि लोकांच्यात द्वेष पसरवणारी वक्तव्य केल्याने मी त्याचा निषेध करत आहे. शेतकऱ्याच्या शेअर्सच्या पैशावर आम्ही कर्ज घेतले याचा लाभ पाहुण्यांना झाला असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी आरोप केले. हे आरोप त्यांनी केले परंतु हे आरोप खोटे आहेत.

कारखान्याच्या शेअर्ससाठी शेतकऱ्यांना आवाहन केल्यावर एवढ्या कमी कालावधीत पैसे जमू शकतात एवढा विश्वास माझ्यावर शेतकरी टाकतात. किरीट सोमय्यांना बघायच असेल तर मी तुम्हाला दाखवू शकतो. 40 हजार शेतकऱ्यांच्या नावावर 10हजार प्रमाणे शेअर्स घेतले आहेत. या शेअर्सचा लाभ आम्ही शेतकऱ्यांना देत असल्याची माहितीही हसन मुश्रीफ यांनी दिली.

किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप मुश्रीफ यांनी फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, सोमय्यांकडून बेताल वक्तव्य केली जात आहेत त्याचा मी निषेध करतो. त्यांनी केलेले आरोप आरोप निराधार आहेत. शेअर, तारणावर कर्ज घेतलं, नातेवाईकांना कर्ज दिलं हे आरोप खोटे आहे. 

हे ही वाचा : '...तर कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक रद्द होईल', कायदे तज्ज्ञांचा मोठा दावा

आम्ही आवाहन केल्यानंतर पैसे गोळा झाले. त्यावर महिन्याला पाच किलो साखर आणि अन्य सोयी देत असतो. मी ठरवल्यास 100 कोटी जमवू शकतो. मी कोणत्याही संकटाला पार करण्यास तयार आहे. शेतकऱ्यांकडून 10 हजार आणि 5 राष्ट्रीयीकृत बँक कर्ज घेऊन माझ्या तीन मुलांनी कारखाना उभा केला असल्याचेही ते म्हणाले. 

First published:

Tags: Kirit Somaiya, Kolhapur