औरंगाबाद, 9 फेब्रुवारी : ठाकरे गटाचे नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली आहे. 40 गद्दारांकडून लोकशाहीचा अपमान सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. ते शिवसंवाद यात्रेमध्ये बोलत होते. संवाद यात्रेला प्रचंड गर्दी जमली आहे. ही गर्दीच सांगते आमचा विजय निश्चित असल्याचं यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी वरळीतील शिंदे गटाच्या शक्तिप्रदर्शनावरून देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे. 40 गद्दारांकडून लोकशाहीचा अपमान सुरू आहे. मात्र आता थोडेच दिवस त्रास सहन करावा लागणार आहे. लवकरच हे सर्व गद्दार आपात्र होणार आहेत. आम्हाला निश्चित न्याय मिळेल. वाद निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली जात आहे. आज शिवसंवाद यात्रेला जी प्रचंड गर्दी होत आहे, ती गर्दीच सांगत आहे की येणाऱ्या काळात आमचा विजय निश्चित असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
वरळीतील शक्तिप्रदर्शनावरून मुख्यमंत्र्यांना टोला
दरम्यान यावेळी आदित्य ठाकरे यांनी वरळीमधील शक्तिप्रदर्शनावरून देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर शिंदे गटाकडून वरळीत शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. या शक्तिप्रदर्शनावरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. ते वरळीमध्ये आले की लोक नाही तर नुसत्या रिकाम्या खुर्च्याच दिसतात असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.