मुंबई, 15 डिसेंबर: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (maharashtra winter assembly session 2020) दुसऱ्या आणि शेवट्या दिवशी सभागृहात महाविकास आघाडी सरकारविरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या उपक्रमावरून थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी... माझे पेपर माझी मुलाखत.. माझे पोलीस, माझा एफआयआर.. अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली.
हेही वाचा..VIDEO विधान परिषदेत काँग्रेसचा तुफान राडा; उपाध्यक्षांनाच खुर्चीवरून खाली खेचलं
राज्य सरकारनं आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पुरवणी मागण्या सादर केल्या. यावर सुधीर मुनगंटीवार हे सभागृहात बोलत होते. यावेळी मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर चौफेर टोलेबाजी केली. एवढंच नाही तर शिवसेनासह राष्ट्रवादीच्या नेत्यांना देखील चिमटे काढले. भाषण वाढत असल्यामुळे मुनगंटीवार यांना मुद्यावर बोलण्याचे सांगण्यात आलं.
सुधीर मुनगंटीवर यांनी पालघर साधु हत्येचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात साधुंची हत्या कशी काय होऊ शकते? आदिवासी बांधवांना नोकऱ्या दिल्या ? तुमच्या पक्षाच्या विचारधारा चांगली, पण या राज्याचा कारभार योग्य नाही, असा टोला शिवसेना नेते अनिल परब यांना उद्देशून मुनगंटीवारांनी टोला लगावला. तुम्ही संवेदनशीलतेने काम करण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री विरोधकांच्या संदर्भात घृणास्पद भावना ठेवून वागतायंत हे योग्य नाही, असंही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं.
...तर संगणकालाही रडू फुटलं
राज्यातील प्रश्नांवर चर्चा होत नाही, असा आरोप यावेळी मुनगंटीवार यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलणे होत नाही. त्यामुळे मी मेल मागवले. जेव्हा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो. एक कर्मचारी हा संगणक पुसत होता. त्याला विचारले असता तो म्हणाला संगणक जरा ओलसर झाले आहे. त्यामुळे ते पुसत आहे. मुळात जनतेचे इतके मेल आले आहे की, संगणकालाही रडू फुटलं' असा टोलाही मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
अजित पवारांनी स्वीकारलं मुनगंटीवारांचं आव्हान...
'आता आम्ही समर्थ आहोत. सभागृह हे माझे कुटुंब आहे. माझ्या भाषणात कुणी अडथळा आणत असेल किंवा अडकाठी आणत असेल तो पुन्हा निवडून येत नाही, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. त्यावर समोरच बसलेले अजित पवार म्हणाले की, 'तुमचे आव्हान मी स्वीकारले. मला पाडूनच दाखवा' असा खुमासदार टोला लगावला.
हेही वाचा...आमदार रवी राणांवर यावरून संतापले विधानसभा अध्यक्ष, म्हणाले सभागृहाच्या बाहेर जा!
त्यावर मुनगंटीवार म्हणाले, 'मुळात पडण्याचे दोन प्रकार आहे. एक लोकशाहीमध्ये आणि दुसरा 23 नोव्हेंबरला आहे. हे आम्ही करून दाखवलं आहे, असं काय करता दादा, आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, असा जोरदार टोला मुनगंटीवार यांनी लगावला.