मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

15 ऑगस्टची सुट्टी जिवावर बेतली, पानशेत धरणात कार बुडाली; डोळ्यादेखत आईने सोडला जीव

15 ऑगस्टची सुट्टी जिवावर बेतली, पानशेत धरणात कार बुडाली; डोळ्यादेखत आईने सोडला जीव

सुदैवाने गाडीच्या पुढच्या बाजूस असलेला त्यांचा मुलगा आणि गाडी चालवत असलेले योगेश यांनी तातडीने गाडीच्या बाहेर उडी मारली. पण,

पुणे, 15 ऑगस्ट : आज 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिवस. आज सुट्टीच्या निमित्ताने पुण्यातील एक कुटुंब पर्यटनासाठी पानशेत धरणावर (Panshet dam ) गेलं होतं. पण, त्यांचं फिरणं हे जीवावर बेतलं आहे.  कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट धरणात बुडाली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. तर पती आणि मुलगा थोडक्यात बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पानशेत धरणाच्या परिसरात आज दुपारी ही घटना घडली. समृद्धी देशपांडे असं मृत महिलेचं नाव आहे. योगेश देशपांडे हे आपल्या पत्नी समृद्धी आणि मुलासोबत पानशेत धरणाजवळील रस्त्यावर वरून जात होते. त्याच दरम्यान अचानक गाडीचे टायर फुटले. गाडी वेगात असल्यामुळे योगेश देशपांडे यांचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यांनी गाडी थांबवण्याचा आटोकात प्रयत्न केला पण गाडी धरणाच्या पाण्यात बुडाली. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमध्ये 'या' पदासाठी जागा रिक्त सुदैवाने गाडीच्या पुढच्या बाजूस असलेला त्यांचा मुलगा आणि गाडी चालवत असलेले योगेश यांनी तातडीने गाडीच्या बाहेर उडी मारली. पण, मागच्या बाजूला बसलेली योगेश यांची पत्नी समृद्धी गाडीच्या काचा बंद असल्याने बाहेर पडू शकली नाही. अचानक आवाज झाल्याने जवळील हॉटेलमधील लोक मदतीला धावून आले. त्यांनी प्रयत्न करून गाडी बुडू दिली नाही. दोराच्या सहाय्याने खेचल्यानं गाडीने तळ गाठला नाही. मोठ्या मेहनतीने समृद्धी यांना गाडीतून बाहेर काढण्यात आलं आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच त्या मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. थर्ड अंपायरने आऊट देण्याऐवजी सुरू केलं भलतच काही, मोठ्या स्क्रीनवर दिसला VIDEO 15 ऑगस्ट रविवारच्या सुट्टी निमित्ताने देशपांडे कुटुंब पानशेत धरण परिसरात पर्यटनाकरता गेलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वेल्हे पोलीस अधिक तपास करत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या