Home /News /sport /

थर्ड अंपायरने आऊट देण्याऐवजी सुरू केलं भलतच काही, मोठ्या स्क्रीनवर दिसला VIDEO

थर्ड अंपायरने आऊट देण्याऐवजी सुरू केलं भलतच काही, मोठ्या स्क्रीनवर दिसला VIDEO

थर्ड अंपायरने केलेल्या चुकीचा व्हिडिओ व्हायरल

थर्ड अंपायरने केलेल्या चुकीचा व्हिडिओ व्हायरल

क्रिकेटच्या मैदानात आपण मजेशीर प्रकार अनेकवेळा बघतो. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान (West Indies vs Pakistan) यांच्यात जमैकाच्या सिबायना पार्कमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टमध्येही अशीच घटना पाहायला मिळाली.

    मुंबई, 15 ऑगस्ट : क्रिकेटच्या मैदानात आपण मजेशीर प्रकार अनेकवेळा बघतो. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान (West Indies vs Pakistan) यांच्यात जमैकाच्या सिबायना पार्कमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टमध्येही अशीच घटना पाहायला मिळाली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दुसऱ्या इनिंगमध्ये पाकिस्तानचा स्कोअर 160/5 एवढा झाला आहे. वेस्ट इंडिजला पहिल्या इनिंगमध्ये मिळालेल्या 34 रनच्या आघाडीमुळे पाकिस्तान आता 124 रनने पुढे आहे. बाबर आझम (Babar Azam) 54 रनवर तर फईम अश्रफ (Faeem Ashraf) 12 रनवर खेळत आहे. केमार रोच (Kemar Roach) आणि जेडन सिल्स (Jayden Seals) यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर जेसन होल्डरने 1 विकेट घेतली. या सामन्यात थर्ड अंपायरने केलेल्या एका चुकीमुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. वेस्ट इंडिजची बॅटिंग सुरू असताना क्रेग ब्रॅथवेटच्या रन आऊटसाठी अपील करण्यात आलं, तेव्हा मैदानातल्या अंपायरने थर्ड अंपायरला निर्णय घ्यायला सांगितलं. थर्ड अंपायरने मायक्रोफोनमध्ये ब्रेथवेट आऊट असल्याचं सांगितलं, पण आऊटचं बटण दाबण्याऐवजी थर्ड अंपायरने विन्डोज मीडिया प्लेयर सुरू केला. मैदानातल्या मोठ्या स्क्रीनवरही आऊटचा निर्णय येण्याऐवजी विन्डोज मीडिया प्लेयर सुरू झाल्याचं दिसलं. क्रेग ब्रॅथवेट या इनिंगमध्ये वेस्ट इंडिजचा स्टार बॅट्सन ठरला, त्याने 97 रनची खेळी केली. फाईन लेगला फ्लिक करून 2 रन काढण्यासाठी ब्रॅथवेट धावला, पण हसन अलीने जलद थ्रो केला आणि बॉल थेट स्टम्पवर लागला. हसन अलीच्या या थ्रोमुळे ब्रॅथवेटचं शतक 3 रनने हुकलं. वेस्ट इंडिजने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले पाकिस्तानला बॅटिंगला बोलावलं, यानंतर त्यांचा 217 रनवर ऑलआऊट झाला. वेस्ट इंडिजने पहिल्या इनिंगमध्ये 253 रन केले, त्यामुळे त्यांना 34 रनची महत्त्वाची आघाडी मिळाली. 4 टी-20 आणि 2 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी पाकिस्तानची टीम वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेली आहे. टी-20 सीरिजच्या 3 मॅच पावसामुळे रद्द झाल्या, तर एक मॅच पाकिस्तानने जिंकली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Pakistan, West indies

    पुढील बातम्या