पुणे, 10 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांविरोधी होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतील साकीनाका येथे एका 30 वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. यानंतर राज्यात ठाणे, डोंबिवली, पुणे येथे बलात्काराच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. यानंतर पुन्हा एक बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरलं आहे. येथील एका युवतीला उत्पादनाची माहिती देण्याच्या बहाण्याने बोलवून तिच्यावर अत्याचार (called for business meeting and raped) केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीनं बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका कंपनीच्या उत्पादनाची ग्राहकांना माहिती देण्याचं काम करते. कंपनीच्या उत्पादनाची माहिती देत असताना, पीडितेची आरोपीशी ओळख झाली होती. यातूनच आरोपीनं अन्य एका ग्राहकाला उत्पादनाची माहिती देण्याच्या बहाण्यानं पुणे स्टेशन परिसरातील एका लॉजवर बोलावलं होतं. दरम्यान आरोपीनं पीडित तरुणीची नजर चुकवून तिला शीतपेयातून गुंगीचं औषध दिलं.
हेही वाचा-सातवीच्या विद्यार्थीनीवर शाळेतच बलात्कार; गट शिक्षणाधिकाऱ्याच्या चालकाचे कृत्य
यानंतर आरोपीनं पीडित तरुणीवर बलात्कार केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने बलात्कार करतानाचे फोटो आणि व्हिडीओज आपल्या मोबाइलमध्ये शूट केले (shoot obscene videos) आहेत. संबंधित अश्लील व्हिडीओ पीडित तरुणीच्या नवऱ्याला पाठवण्याची आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, नराधम आरोपीनं पीडितेवर अनेकदा अत्याचार केला आहे.
हेही वाचा-अभ्यास ठरलं अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचं कारण; कोल्हापुरातील हृदय हेलावणारी घटना
आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून 25 वर्षीय पीडित तरुणीनं बंडगार्डन पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचं काम करत आहेत. आरोपीचा शोध सुरू असून या घटनेचा पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.