इचलकरंजी, 10 ऑक्टोबर: कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे (Corona pandemic) देशातील शाळा, महाविद्यालये गेल्या जवळपास पावणे दोन वर्षांपासून बंद होते. अलीकडेच राज्य शासनाने दहावीपर्यंतच्या शाळा पुन्हा करण्याची परवानगी (School Reopen) दिली आहे. तब्बल दीड वर्षांच्या ब्रेकनंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेचा रस्ता पकडला आहे. पण कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अनेक पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास धजावत आहेत. त्यामुळे वर्गातील विद्यार्थी संख्या देखील घटली आहे. अशात कोल्हापुरातून एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील चांदणी चौक परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं गळफास (minor female student commits suicide) घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. संबंधित मुलीला आईनं अभ्यास करण्यासाठी सांगितलं होतं. पण तिला कंटाळा आल्यानं आई आणि मुलीमध्ये किरकोळ वाद झाला होता. याच कारणातून संबंधित मुलीनं रागाच्या भरात घराच्या वरच्या खोलीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केली आहे. एवढ्या किरकोळ कारणातून मुलीनं आत्महत्या केल्यानं आई-वडिलांना धक्का बसला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा-सातवीच्या विद्यार्थीनीवर शाळेतच बलात्कार; गट शिक्षणाधिकाऱ्याच्या चालकाचे कृत्य
प्राजक्ता दीपक कोकरे असं आत्महत्या करणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं नाव आहे. ती इचलकरंजी शहरातील चांदणी चौक परिसरातील रहिवासी आहे. दरम्यान काल आईनं मृत प्राजक्ता हिला अभ्यास करण्यास सांगितलं होतं. पण प्राजक्ताने कंटाळा आल्याचं सांगत, मला झोप आली आहे, त्यामुळे मी अभ्यास करणार नाही, असं तिने आपल्या आईला सांगितलं. यावरून दोघी मायलेकीत किरकोळ वाद झाला.
हेही वाचा- Shocking! रविवारी UPSC Preliminary Examच्या आधी तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
यानंतर प्राजक्ताने रागाच्या भरात घरातील वरच्या खोलीत जाऊन लोखंडी अँगलला ओढणीनं गळफास लावत आत्महत्या केली आहे. ही घटना काल दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मुलीचे वडील दीपक कोकरे यांच्या फिर्यादीवरून गावभाग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.