मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

सातवीच्या विद्यार्थीनीवर शाळेतच बलात्कार; गट शिक्षणाधिकाऱ्याच्या चालकाचे कृत्य, मुख्याध्यापक निलंबित

सातवीच्या विद्यार्थीनीवर शाळेतच बलात्कार; गट शिक्षणाधिकाऱ्याच्या चालकाचे कृत्य, मुख्याध्यापक निलंबित

पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी चालकाला अटक केली आहे. तर प्रकरणाचे गांभीर्य पाहता गाझीपूरच्या जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित केलं आहे.

  • Published by:  News18 Desk
गाझीपूर, 09 ऑक्टोबर : एका सरकारी शाळेत सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच एका खोलीत बलात्कार (Minor girl raped) करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. गट शिक्षणाधिकाऱ्याच्या खाजगी चालकाने अल्पवयीन मुलीवर शाळेच्या आवारात बलात्कार (rape) केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी चालकाला अटक केली आहे. तर प्रकरणाचे गांभीर्य पाहता गाझीपूरच्या जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित केले असून प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती तयार केली आहे. हा सर्व प्रकार उत्तर प्रदेशच्या गाजीपूर जिल्ह्यात घडला आहे. ही लाजिरवाणी घटना समोर आल्यानंतर स्थानिक लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. त्याचबरोबर जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. इयत्ता सातवीच्या अल्पवयीन मुलीवर सरकारी शाळेच्या खोलीतच बलात्कार करण्यात आल्याने आता शाळा व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणात प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याने शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित केलंय. हे वाचा - Japan India Bilateral Maritime Exercise : फायटर जेट, गायडेड मिसाइल्स…. भारताने जपानबरोबर संयुक्त युद्धसराव केल्याने चीन-पाकला झोंबणार मिरच्या? हे प्रकरण मर्दाह पोलीस ठाण्याच्या परिसरातील आहे. आरोपी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन विद्यार्थीनीचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यासह तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पोलीस या शाळेच्या मुख्याध्यापकाचीही चौकशी करू शकतात. हे वाचा - पुण्यातील गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार; महिला डॉक्टरचे नग्न VIDEO आणि फोटो केले Viral गटशिक्षणाधिकाऱ्यांचा खासगी वाहन चालक बऱ्याच शाळेत येत असल्याचे सांगण्यात आले आहे. अल्पवयीन मुलगी एकटी सापडल्यानंतर त्याने तिच्यासोबत बलात्कार केल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत कडक भूमिक घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
First published:

Tags: Rape news, Rape on minor

पुढील बातम्या