मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात नवोदित अभिनेत्रीवर बलात्कार; चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने 2 वर्षे अत्याचार

पुण्यात नवोदित अभिनेत्रीवर बलात्कार; चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने 2 वर्षे अत्याचार

Rape in Pune: पुण्यात शॉर्ट फिल्म निर्मात्याने एका नवोदित अभिनेत्रीवर बलात्कार (short film maker raped budding actress) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

    पुणे, 20 ऑक्टोबर: कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या एखाद्या कलाकाराला चित्रपट सृष्टीत जाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. काहींना संधी मिळेपर्यंत त्याचं आर्ध आयुष्य संपून जातं. बरेच प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. अशावेळी अशा गरजू कलाकारांना विविध प्रकारचं आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. येथील एका शॉर्ट फिल्म निर्मात्या व्यक्तीने एका नवोदित अभिनेत्रीवर बलात्कार (short film maker raped budding actress) केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं पीडित तरुणीला चित्रपट आणि मालिकांमध्ये काम मिळवून देण्याचं आमिष (lure of giving role in film and series) दाखवून तिच्यावर अत्याचार केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून नराधम आरोपी पीडितेवर बलात्कार करत होता. याप्रकरणी 31 वर्षीय पीडित महिलेनं कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा-दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या अभिनेत्रीसोबत विमानात अश्लील चाळे; विकृताला अटक समीर बाळू निकम असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी समीर हा यूट्यूबवर शॉर्ट फिल्म बनवतो. त्याने युट्यूबवर काही शॉर्ट् फिल्म्स आणि गाणी बनवली आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याची पीडित महिलेशी ओळख झाली होती. यानंतर त्यांच्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. आरोपी समीरने पीडितेला चित्रपट आणि मालिकांमध्ये काम मिळवून देण्याचं आमिष दाखवलं. हेही वाचा-पुणे: विवाहित बहिणीसोबत भावाचं विकृत कृत्य; नवरा घरी नसताना भेटायला आला अन्... यानंतर आरोपीने काम देण्याचं आमिष दाखवून नवोदित अभिनेत्रीचं शोषण केलं आहे. मागील दोन वर्षांपासून आरोपी पीडितेवर अत्याचार करत होता. याप्रकरणी 31 वर्षीय पीडित महिलेनं कोंढवा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune, Rape

    पुढील बातम्या