सरकारी नियमांना केराची टोपली, राष्ट्रवादीच्या नेत्याची जंगी मिरवणूक

सरकारी नियमांना केराची टोपली, राष्ट्रवादीच्या नेत्याची जंगी मिरवणूक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर शासकीय नियमांची पायमल्ली होत असल्याचं चिञ समोर येत आहे.

  • Share this:

पुणे, 01 जुलै : राज्यभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. संसर्ग वाढू नये यासाठी दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवण्याचं सरकारकडून वारंवार आवाहन केले जात आहे. पण शिरूर बाजार समितीच्या सभापती निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित सभापती शंकर जांभळकर यांची त्यांच्या करंदी गावात जंगी मिरवणूक काढून गुलालाचीही उधळण करत कार्यकर्त्यांनी डान्स केला.  यावेळी राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचा पार फज्जा उडवण्यात आला. अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर शासकीय नियमांची पायमल्ली होत असल्याचं चिञ समोर येत आहे. शिरुर तालुक्यातील मोराची चिंचोली येथे मागील आठवड्यात एका लग्न समारंभांत एकञ येत नवरदेवाची वरात काढली . तर मंगळवारी कोरेगाव भीमा येथे तीसहून अधिक युवकांनी एकत्र येत वाढदिवस साजरा केला होता. या दोन्हीही प्रकरणी पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहे.

कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या मंत्र्याने मुंबई पोलिसांच्या ‘या’ निर्णयावर टीका

परंतु,शिरूर तालुक्यात बाजार समितीच्या सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सभापतीची गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील युवकांनी गुलालाची उधळण करून, डान्स करत मिरवणूक काढली. पण यावेळी कोणत्याही युवकांनी तोंडावर मास्क घातलेले दिसत नव्हते ना सार्वजनिक अंतर पाळलेले होते.

आता 2 दिवसांनंतर या मिरवणुकीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, त्यानंतर देखील प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली नाही आणि मिरवणूक करणाऱ्या नागरिकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही.

आता काय म्हणावं याला! भाजीत सापडलेल्या अळ्याही त्याने पाळल्या

एकंदरीत शिरूर तालुक्यातील दोन ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिरूर व शिक्रापूर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे.  त्यामुळे पोलीस काय पाऊल उचलता याकडे सर्वांचं लक्ष लागले होते.

अखेर,  आज दुपारी बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती शंकर जांभुळकर यांच्यासह 15 लोकांवर शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 दिवसांपूर्वीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

संपादन - सचिन साळवे

First published: July 1, 2020, 12:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading