मुंबई 30 जून: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Maharashtra health minister Rajesh Tope) हे कोरोनाविरुद्धआघाडीवर लढत आहेत. त्यांच्या कामाचं अनेक नेत्यांनी कौतुकही केलं आहे. कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या वाढत असतानाच आता त्याला रोखायचं कसं यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. मात्र मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) घेतलेला एक निर्णय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुंबई पोलिसांनी मुंबईत 2 किलोमीटर वाहतुकीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर राजेश टोपे यांनी टीका केली आहे. मुंबई पोलिसांच्या या निर्णयामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत असून त्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर कारवाई करत पोलिसांनी शेकडो गाड्या जप्त केल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या या निर्णयाविरुद्द अनेक मंत्र्यांनीही उघडपणे भूमिका घेतली आहे. आता त्यात राजेश टोपे यांचीही भर पडली आहे. मुंबईत 2 किलोमीटर वाहतुकीवर निर्बंध लादण्याचा निर्णय वाईट नाही. त्यांच्या निर्णयाचा हेतू चांगला आहे पण अंमलबजावणीसाठी हा निर्णय व्यवहार्य नाही अशी टीकाही त्यांनी केली. या आधी काँग्रेसच्या नेत्यांनीही या निर्णयावर टीका केली होती. हे वाचा - भारतातील सर्वात वयस्कर कोरोना फायटर; 103 वर्षांच्या आजोबांनी व्हायरसला हरवलं गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात Coronavirus चे नवे 4878 रुग्ण दाखल झाले. दररोज निदान होणाऱ्या रुग्णांच्या एक दिवसाची संख्या थोडी कमी झाल्यासारखं वाटत असतानाच महाराष्ट्राचा एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा पावणेदोन लाखांपर्यंत पोहोचला आहे. पण त्याच वेळी बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. आतापर्यंत 174761 पैकी 90,911 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. फ्रान्ससारख्या एकेकाळच्या कोरोना हॉटस्पॉटपेक्षा जास्त रुग्ण आज फक्त राज्यातच निघाले आहेत. महाराष्ट्राचा कोविड मृत्यूदर भारताच्या इतर राज्यांच्या तुलनेत अजूनही जास्तच आहे. गेल्या 48 तासांत 95 तर आधीच्या काही दिवसांतले मिळून 150 असे 245 कोरोना मृत्यू आज राज्यात नोंदले गेले. गेले काही दिवस दररोज किमान पाच हजारांची रुग्णवाढ होत आहे. आज दिवसभरात 4878 रुग्ण नव्याने दाखल झाले, तर 1951 रुग्णांना बरं होऊन डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेटसुद्धा थोडासा सुधारला आहे. हे वाचा - CORONIL चं भवितव्य काय? केंद्राकडून विक्रीला परवानगी; तर हायकोर्टात बंदीची मागणी राज्यात सध्या 75,979 अॅक्टिव्ह कोरोनारुग्ण आहेत. मुंबई महानगर भागातच यातले 50 हजारहून अधिक रुग्ण आहेत. तर पुणे परिसराचा आकडा 10 हजारांच्या पुढे आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या या महानगरांसह 12 जिल्ह्यांमध्ये उद्यापासून लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दिली. संपादन - अजय कौटिकवार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.