आता काय म्हणावं याला! भाजीत सापडलेल्या अळ्याही त्याने पाळल्या

आता काय म्हणावं याला! भाजीत सापडलेल्या अळ्याही त्याने पाळल्या

भाज्यांमध्ये अळ्या सापडल्या नंतर त्यांना काढून टाकण्याऐवजी या व्यक्तीने पाळल्यात.

  • Share this:

लंडन, 1 जुलै : भाज्यांमध्ये अळी किंवा एखादी किड दिसल्यास तुम्ही काय करता? साहजिकच भाजीतली ती अळी काढण्याचा प्रयत्नही तुम्ही करत नाही, थेट जितक्या भाजीत अळी सापडली ती भाजीच टाकून देता. मात्र लंडनमधील एका व्यक्तीच्या बाबतीत हे उलट आहे. त्याला भाजीत अळ्या सापडल्या त्यानंतर त्याने ती भाजी किंवा त्यातील अळ्या काढून टाकून न देता उलट त्यांना पाळलं आहे. काय तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना? भाजीतल्या अळ्या कोण पाळेल, असंच तुम्हालाही वाटतं ना?

इव्हनिंग स्टॅंडर्डमध्ये प्रसिद्ध रिपोर्टनुसार, लंडनमध्ये राहणारा 27 वर्षांचा सॅम डार्लेस्टोन याने काही भाज्या खरेदी केल्या. ब्रोकोलीमध्ये त्याला तब्बल 6 आणि दुसऱ्या एका भाजीत एक अशा एकूण सात अळ्या सापडल्या. सॅमने त्यांना टाकून देण्याऐवजी पाळल्या.

सॅमने याबाबत ट्विटही केलं आहे. जे त्याने ज्या ठिकाणाहून ही भाजी आणली त्या दुकानाला ट्वीट केलं आहे. सॅम म्हणाला, "मी माझी आवडती भाजी ब्रोकोली बनवायला गेलो. भाजीत मला अळ्या सापडल्या. त्या खूपच छान आहेत आणि मी आता पाळत आहे"

हे वाचा - प्रेमात धोका मिळाल्यानंतर मुंबई, पुणेकर काय करतात? सर्वेक्षणात समोर आली बाब

जोपर्यंत या अळ्या मोठ्या होत नाहीत तोपर्यंत सॅम त्यांना पाळणार आहे.

इव्हिनिंग स्टॅंडर्शी बोलताना सॅम याने सांगितलं, "जर मी या अळ्यांना भाज्यांतून काढून टाकलं तर त्या जगतील असं मला वाटत नाही. ज्या झाडावर या अळ्या असतात त्याच झाडावर त्या जगतात असं मी वाचलं होतं. माझ्या गार्डनमध्ये ब्रोकोलीही नाही. त्यामुळे मी आणलेल्या ब्रोकोलीसह या अळ्या ठेवल्यात. जेव्हा त्या मोठ्या होतील तेव्हा त्या जातील"

हे वाचा - चंद्रावर वापरता येईल असं टॉयलेट तयार करा आणि लाखो रुपये जिंका; NASA चं चॅलेंज

ही बातमी वाचल्यानंतर तुम्हाला थोडा नाही जास्तच धक्का बसला असेल. मात्र आता याला सॅमचा वेडेपणा म्हणावा की माणुसकी ते समजतच नाही. अगदी छोट्याशा छोट्या जीवावरही असलेलं त्याचं प्रेम यातून दिसून येतं आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: July 1, 2020, 4:06 PM IST

ताज्या बातम्या