Home /News /pune /

Murder in Pune: आजारी वडिलांचं झालं ओझं; उरुळी कांचनमध्ये मद्यपी मुलानं ब्लेडनं चिरला गळा

Murder in Pune: आजारी वडिलांचं झालं ओझं; उरुळी कांचनमध्ये मद्यपी मुलानं ब्लेडनं चिरला गळा

Murder in Pune: वयोवृद्ध वडिलांच्या आजारीपणाला कंटाळून (burden of sick father) मुलानं आपल्या जन्मदात्याची ब्लेडनं (Blade) गळा चिरून निर्घृण हत्या (alcoholic son chopped fathers throat) केली आहे.

    उरुळी कांचन, 11 जून: वयोवृद्ध वडिलांच्या आजारीपणाला कंटाळून (burden of sick father) मुलानं आपल्या जन्मदात्याची ब्लेडनं (Blade) गळा चिरून निर्घृण हत्या (alcoholic son chopped fathers throat) केली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी मुलाने तीन दिवस मृतदेह घरातचं गुंडाळून ठेवला होता. घरातून दुर्गंधी यायला सुरुवात झाल्यानंतर या खळबळजनक घटनेचा खुलासा झाला आहे. उरुळी कांचन पोलिसांनी आरोपी मुलाच्या मुसक्या आवळल्या असून घटनेचा तपास सुरू केला आहे. संबंधित हत्या झालेल्या 67 वर्षीय वयोवृद्ध वडिलांचं नाव रहिम गुलाब शेख असं आहे. मृत शेख मागील बऱ्याच काळापासून दीर्घ आजाराने ग्रस्त होते. आजारी वडिलांच्या उपचारासाठी पैसे नसल्याने ते घरातचं पडून होते. दरम्यान 8 जून रोजी आरोपी मुलगा नईम रहिम शेख याच आपल्या वडिलांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. यानंतर आरोपीने दारूच्या नशेत आपल्या वडिलांची धारदार ब्लेडनं गळा चिरून हत्या केली. यानंतर आरोपीने आपल्या वडिलांचा मृतदेह घरातचं गुंडाळून ठेवला. हत्येच्या तीन दिवसांनंतर, मृतदेहाची दुर्गंधी सुटली. यानंतर हत्येचा उलगडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लोहमार्गाच्या बाजूला दारूच्या नशेत निवांत झोपलेल्या मुलाला अटक केली आहे. नईमला अटक झाल्यावर 'मैंने उनको आजाद कर दिया' असं तो पोलिसांना सांगत होता. आरोपी नईम रहिम शेखचं काही दिवसांपूर्वी आपल्या बायकोसोबत भांडण झालं होतं. त्यामुळे तो आपल्या वडिलांना घेऊन बहिण शहेनाज रशीदखान जमादार यांच्याकडे राहत होता. आपल्या बहिणीच्या घरीच आरोपीनं आपल्या वडिलांची निर्घण हत्या केली आहे. हे ही वाचा-चिकन विक्रेत्याचा 12 वर्षीय मुलीवर बलात्कार; गुंगीचं औषध देऊन वारंवार अत्याचार विशेष म्हणजे, आरोपी नईमने सात वर्षांपूर्वी आपल्या बायकोसोबत वाद झाल्यानंतर तिच्यावरही ब्लेडने वार केले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा नईम शेख याला अटक केली आहे. तसेच या हत्येप्रकरणात बहिणीचा सहभाग आहे का? याचा तपासही उरुळी कांचन पोलिसांकडून केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder, Pune

    पुढील बातम्या