चिकन विक्रेत्याचा 12 वर्षीय मुलीवर बलात्कार; गुंगीचं औषध देऊन वारंवार अत्याचार, सांगलीतील घटना

चिकन विक्रेत्याचा 12 वर्षीय मुलीवर बलात्कार; गुंगीचं औषध देऊन वारंवार अत्याचार, सांगलीतील घटना

Crime in Sangli: सांगली जिल्ह्यातील मिरज याठिकाणी एका 25 वर्षीय तरुणाने 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape On minor girl) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

मिरज, 11 जून: सांगली (Sangli) जिल्ह्यातील मिरज याठिकाणी एका 25 वर्षीय तरुणाने 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape On minor girl) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी युवकाने पीडित मुलीला अश्लील व्हिडीओ (Obscene Video) दाखवून अन् गुंगीचं औषध देऊन वारंवार बलात्कार  केला आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं या घटनेची माहिती आपल्या आईला दिली. यानंतर पीडितेच्या आईनं पोलिसांत गुन्हा दाखल (FIR) केला आहे. मिरज पोलिसांनी आरोपी तरुणावर  बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (Rape and POCSO case) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास मिरज पोलीस करत आहेत.

संबंधित 25 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव फैय्याज मेहबूब कोकणे असून तो मिरजेतील बोकड चौक येथील रहिवासी आहे. आरोपीचं बोकड चौकात चिकनचं दुकान आहे. याठिकाणी चिकन घ्यायला येणाऱ्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीशी आरोपी कोकणेची काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. यानंतर 22 मार्च रोजी अल्पवयीन मुलगी घरी एकटीचं असल्याचं पाहून आरोपी कोकणे मुलीच्या घरी गेला. याठिकाणी आरोपीने पीडितेला घराबाहेर बोलावून नकळत गुंगीची गोळी खायला दिली. यानंतर आरोपी तिला तिच्याच घरात घेऊन गेला.

पुढारीने दिलेल्या वृत्तानुसार, घरात गेल्यानंतर आरोपीनं पीडितेला अश्लील व्हिडीओ दाखवून लैंगिक चाळे करायला सुरुवात केली. पीडिता याला विरोध करत असताना आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरचं थांबला नाही, तर त्याने अशाच प्रकारे अनेकवेळा तिच्यावर बलात्कार केला आहे. यानंतर पीडितेनं आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून या घटनेची माहिती तिच्या आईला दिली. यानंतर या संतापजनक घटनेला वाचा फुटली आहे.

हे ही वाचा-शिक्षक नव्हे भक्षक! दोन शिक्षकांचा चिमुरडीवर अत्याचार, गर्भवती राहिली अन्..

पीडित मुलीच्या आईने घटनेची माहिती मिळताच आरोपी तरुणाविरुद्ध मिरज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी फैय्याज मेहबूब कोकणे विरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास मिरज पोलीस करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: June 11, 2021, 7:52 AM IST

ताज्या बातम्या