मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

मित्रांसोबत विना मास्क थिरकला नवरदेव, VIDEO व्हायरल होताच 25 जणांवर गुन्हा

मित्रांसोबत विना मास्क थिरकला नवरदेव, VIDEO व्हायरल होताच 25 जणांवर गुन्हा

डीजेच्या तालावर कर्कश आवाजात नवरदेव चक्क विना मास्क मित्रमंडळींसोबत थिरकल्याचं समोर आलं आहे.

डीजेच्या तालावर कर्कश आवाजात नवरदेव चक्क विना मास्क मित्रमंडळींसोबत थिरकल्याचं समोर आलं आहे.

डीजेच्या तालावर कर्कश आवाजात नवरदेव चक्क विना मास्क मित्रमंडळींसोबत थिरकल्याचं समोर आलं आहे.

शिरुर, 27 जून: सर्वात जास्त मोरांची संख्या असलेल्या शांतता प्रिय गावात डीजेच्या तालावर कर्कश आवाजात नवरदेव चक्क विना मास्क मित्रमंडळींसोबत थिरकल्याचं समोर आलं आहे. नवरदेवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यप्रकरणी पोलिसांनी नवरदेव आणि नवरीच्या आई-वडिलांसह 20 ते 25 वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातल्या मोराची-चिंचोली गावात ही घटना घडली आहे.

हेही वाचा... कोरोनावर इंजेक्शन निघालं, पण ते आपल्याला परवडणारं नाही; शरद पवारांचा मोठा खुलासा

कोरोनाच्या संकटकाळात पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी लग्न समारंभात फक्त 50 लोकांना परवानगी दिली आहे. याशिवाय मास्क, सॅनिटायझर वापरायला सांगितले आहे. मात्र असं असताना या कुटुंबाने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे पुढे आले आहे.

डीजेच्या तालावर नवरदेव आणि त्यांचे मित्रमंडळी थिरकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. ही बाब पोलिसांना समजताच त्यांनी कारवाई बडगा उगारला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नवरदेवासह ही सगळी मंडळी डीजेच्या तालावर थिरकताना दिसत आहेत. नवरदेवासह कोणीही मास्कचा वापर केलेला दिसत नाही. त्याचप्रमाणे सोशल डिस्टसिंगचा देखील फज्जा उडाला आहे.

हेही वाचा...RBI ने भारतात खरंच गुगल पे बंद केलं? काय आहे पूर्ण प्रकरण जाणून घ्या

गणेश आप्पासाहेब थोपटे याचं 25 जूनला लग्न होत. लग्नात कोणीही मास्क न लावता. सोशल डिस्टंसिंगचा वापर केला नाही शिवाय कोणतेही वाद्य वाजवण्याची परवानगी घेतली नाही. याबाबत नवरा मुलगा व नवरी मुलीचे आई-वडील यांच्यासह 20 ते 25 लोकांच्या विरोधात शिरुर पोलिसांत 26 जून रोजी अखेर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती शिरुरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापूरे यांनी दिली आहे. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल पालवे करत आहेत.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Pune news, Shirur