नवी दिल्ली, 27 जून : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) सोशल मीडियावर गूगल पेबाबत होणारा दावा फेटाळून लावला आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की RBIने गुगल पे या पेमेंट अॅपवर बंदी घातली आहे. गुगल पेने एक निवेदन जारी केले आहे ज्यामध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की Google pay भारतात अधिकृत आहे आणि देशातील अन्य मान्यताप्राप्त UPI अॅप प्रमाणेच कायदेशीर आहे. गुगल पेद्वारे पैसे ट्रान्सफर करणं हे कायद्यानं सुरक्षित नाही अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे अॅप अनअधिकृत असल्याचंही म्हटलं आहे. पण कंपनीनं याबाबत निवेदन जारी केलं आहे. हे अॅप थर्ड पार्टी आहे ही गोष्ट खरी आहे. थर्ड पार्टी अॅपची लिस्ट NPCI वेबसाइटवर उपलब्ध आहे.
Google Pay operates completely within the law. We work as a technology service provider to partner banks, to allow payments via UPI. UPI apps in the country are categorized as 'third party apps', and are not required to be 'payment systems operators'.
— Google Pay India (@GooglePayIndia) June 24, 2020
➡ https://t.co/7sQv2A3mzS
हे वाचा- माणुसकी मेली! कोरोना रुग्णाचा मृतदेह जेसीबीमध्ये फेकला, मन हेलावणारा VIDEO समोर याआधी गुगल पेने बुधवारी म्हटले की, ट्वीटमध्ये म्हटलं आहे की पेमेंट्स पूर्णपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार निश्चित केले जातात. गुगल पे प्लॅटफॉर्मवरुन पैसे ट्रान्सफर करताना काही अडचण आल्यास कायद्याद्वारे तो सोडवली जाऊ शकत नाही कारण हे अॅप अनधिकृत आहे. हा फिरणारा मेसेज चुकीचा असल्याची माहिती गुगलच्या प्रवक्त्याने दिली आहे. तर NPCI च्या वेबसाईटवर हे तुम्ही व्हेरिफाय करू शकता. RBIने कोर्टाच्या सुनावणीत असं कुठेही म्हटलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. संकलन, संपादन- क्रांती कानेटकर