Home /News /pune /

शरीर सुखाला नकार दिल्यानं भावाजयीचा खून, पुणे जिल्ह्यातील थरारक घटना

शरीर सुखाला नकार दिल्यानं भावाजयीचा खून, पुणे जिल्ह्यातील थरारक घटना

भयंकर... वारंवार शरीर सुखाची मागणी करूनही भावजयी तयार होत नाही, या रागातून नराधम दीरानं....

पुरंदर, 23 सप्टेंबर: वारंवार शरीर सुखाची मागणी करूनही भावजयी तयार होत नाही, या रागातून नराधम दीरानं भावजायीवर तीक्ष हत्यारानं प्राणघातक वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खून रिसे (ता.पुरंदर, जि. पुणे) येथे ही थरारक घटना घडली आहे. खून केल्यानंतर आरोपी दीर मुबारक कादर सय्यद हा फरार झाला आहे. हेही वाचा...भयंकर! दारुड्या बापानंच आपल्या पोट्याच्या मुलाला 5 लाखांत तृतीयपंथीयाला विकलं जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे रिसे येथील आरोपी मुबारक कादर सय्यद हा आपली भावाजयीवर डोळा ठेऊन होता. त्यानं तिच्याकडे वारंवार शरीर सुखाची मागणीही केली होती. मात्र, तिचा व विरोध होता. मात्र, आरोपीनं 21 सप्टेंबरच्या रात्री जेवणानंतर घराचे बाहेर भांडी घासत असताना तिला पुन्हा शरीर सुखाची मागणी केली. मात्र, तिनं नकार दिल्यानं रागाच्या भरात आरोपी मुबारक कादर सय्यद यानं घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून भावाजयीवर हल्ला केला. सुरीनं तिच्या गळा आणि छातीवर सपासप वार केला. भावजायीचा जागेवरच मृत्यू झाला. घरातील इतर सदस्यांनी आरडाओरडा केला असता आरोपी पसार झाला. या प्रकरणी मृत महिलेची मुलगी हसीना नासीर मुलानी हिनं जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपीचा शोध घेण्यास दोन पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नराधम पतीचं मित्रासोबत आपल्याच अर्धांगिनीशी अनैसर्गिक कृत्य दुसरीकडे, अशीच एक घटना दोन दिवसांपूर्वी जळगाव येथे उघडकीस आली होती. नराधम पतीनं मित्रासोबत आपल्याच अर्धांगिनीशी अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केला आहे. ही धक्कादायक घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. जळगाव शहरात पिंप्राळा भागातील प्रल्हाद नगरात ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी पती व त्याच्या मित्राविरुद्ध रामानंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधम पतीला ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी फरार आहे. सदर पीडित महिला, तिचा पती व तीन मुले जून महिन्यांपासून आरोपी मित्राच्या घरात भाड्यानं राहात होते. आरोपी एकटाच राहात होता. नराधम पती आपल्या पत्नीला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करत होता. मात्र, तसं करण्यास पीडितेचा विरोध होता. पतीनं वाद घातला. मित्रासोबत शरीर संबंध ठेवण्यास तो जबरदस्ती करत होता. तो घराबाहेर पडला. येताना तो कोल्ड्रिक्स घेऊन आला. कोल्ड्रिक्स प्यायल्यानंतर पीडितेला चक्कर आले. त्यातच नराधम पतीनं तिला पकडलं आणि मित्रानं तिच्यावर अत्याचार केला. नराधम पतीनं पत्नीचे दोन्ही हात पकडून ठेवले आणि मित्रानं तिच्यावर अनैसर्गिक कृत्य करत अत्याचार केला. नंतर याबाबत वाच्यता केल्यास मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी पतीनं आपल्या पत्नीला दिली. हेही वाचा...बापाला हवा मुलगा; बाळाचे लिंग पाहण्यासाठी गर्भवती पत्नीचं पोटच कापलं नंतर नराधम पतीनं पत्नीला माहेरी पाठवून दिलं. पीडितेनं सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. नंतर थेट पोलिस स्टेशन गाठून पीडितेनं पोलिसांना आपबिती सांगितली. पीडितेच्या तक्रारीवरून पती व त्याचा मित्र रमेश काकडे या दोघांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी दिली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Maharashtra, Pune, Pune crime news, Purandar

पुढील बातम्या